पावसाळ्यात वर्षा विहाराचा आनंद घेणे हे काही गैर नाही पण योग्य खबरदारी न घेता धबधब्यावर जाणे किंवा समुद्राच्या जवळ जाणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. पावसाळा सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर धबधब्यावर किंवा समुद्रकिनारी होणाऱ्या अपघातांचे अनेक व्हिडिओ चर्चेत आले आहे. पुण्याजवळील लोणावळा आणि ताम्हिणी येथे धबधब्यावर घडलेल्या दुर्घटनेची अजूनही सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यामुळे लोकांना वारंवार धबधब्यासारख्या ठिकाणी जाताना खबरदारी घेण्याचे, धोकादायक ठिकाणी जाऊ नका असे आवाहन केले जाते पण लोक काही त्याकडे लक्ष देत नाही. दरम्यान पुन्हा सोशल मीडियावर धबधब्यावरील अपघाताचा Video Viral होत आहे जे पाहून अंगावर काटा येईल.

धबधब्यावर भिजण्यासाठी गेला अन् पाय घसरून पडला

या व्हायरल व्हिडीओमध्ये धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेताना काही लोक दिसत आहे. धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह कमीच आहे पण तेथील सर्व दगड ओले झाले आहेत. दरम्यान ओल्या दगडांवर एक तरुण बिनधास्तपणे चालताना दिसतो. ओल्या दगडांवरून घसरू नये म्हणून तरुण कोणतीहीच काळजी घेत नव्हते शेवटी जे व्हायला नको तेच झाले. तरुणाचा पाय घसरला तो जोरात आपटला. एवढच नाही तर निसरड्या दगडांवरून तो घसरत खाली गेला. तो जिथे पडतो तिथे खाली काही तरुणी धबधब्यांसमोर फोटो काढत उभ्या असतात. अचानक हा तरुण वरून घसरत खाली आल्याने एका तरुणीला जाऊन जोरात धडकतो ज्यामुळे दोघेही तिथे साचलेल्या पाण्यात पडतात. सुदैवाने दोघांचा जीव वाचतो. या व्हायरल व्हिडीओतून बोध इतकाच मिळतो की, धबधब्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर सावगिरी बाळगली पाहिजे. आपली एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते.

हेही वाचा – YouTuber Gulzar Sheikh: रेल्वे ट्रॅकवर सिलिंडर, जिवंत कोबंडी ठेवणाऱ्या युट्यूबर गुलझार शेखला अटक, व्हिडीओ व्हायरल

येथे पाहा Viral Video

हेही वाचा – ‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ साचलेल्या पाण्यातून वाहन चालवताना तुमची एक चूक बेतू शकते इतरांच्या जीवावर

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ इंस्टाग्रामवर hamar_rajim__ नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये छत्तीसगढ़ येथील चिंगरा पगार धबधबा येथील आहे. एकाने कमेंट करतना लिहिले की, “सावधानी हटी, दुर्घटना घटी” दुसऱ्याने सांगितले, “ट्रेकिंग करताना नेहमी शूज वापरा”