Father son Viral post: बाप आणि मुलाचं नातं हे वरकरणी शांत दिसत असलं तरी ते नातं मूळापासून नेहमी घट्ट असतं. मुलं जशी मोठी होतात, तशी त्यांना हळूहळू त्यांची आर्थिक जबाबदारी समजत जाते. अर्थात, त्याला वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा पदरही असतो. आपलं ध्येय गाठण्याच्या ओघात कळत-नकळत त्यांचं घराकडे, घरच्या माणसांकडे दुर्लक्ष होत जातं. अशाच स्वत:ला कामात, जबाबदारीत गुंतवून घेतलेल्या वडिलांना जेव्हा मुलाच्या आधाराची गरज असते तेव्हाच जर तो ऐन तारुण्यात वाईट वळणाला गेला, तर त्या बिचाऱ्या बापाला जो चिंतेचा घोर लागत असेल आणि त्यामुळे त्याच्या काळजात किती कालवाकालव होत असेल? जरा विचार करा.

वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाहीत, तर मग पुढे मुलांवर बहुतांशी वाईट संगतीचा विपरीत परिणाम होतो. मुलांनी चांगलं वागावं, कधीच कोणाचा अपमान करू नये, त्यांना चांगलं काय, वाईट काय यातील फरक कळावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र, हीच मुलं जर चुकीच्या वळणाला गेली, तर आई-वडिलांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाची राखरांगोळी झाल्यासारखी त्यांची स्थिती होते. अशाच एका मुलानं केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे वडिलांवर आपल्याच मुलाविरोधात जाहिरात देण्याची वेळ आली आहे.

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

काय आहे जाहिरात

या जाहिरातीवर लिहिलेला मजकूर पाहून तुम्हीही म्हणाल की, अशी वेळ कोणत्याच वडिलांवर येऊ नये. या जाहिरातीवर “माझा मुलगा दीपक बाळू मोरे; वय वर्ष २२, रा. प्रभाकर वस्ती, बुधवार पेठ, सोलापूर हा वाईट लोकांच्या संगतीने बिघडला असून, लोकांकडून उधार उसनवारीच पैसे घेणे, दारू पिणे, जुगार खेळणे आदी व्यसनांत तो गुरफटला आहे. याअगोदरही त्याने अनेकांकडे केलेली उधार उसनवारी आणि व्याजाने घेतलेले पैसे आम्ही अनेक पट रक्कम देऊन फेडली आहे. परंतु, आता त्याने घेतलेल्या रकमेची अथवा केलेल्या व्यवहाराची जबाबदारी आमची राहिली नसून, यापुढे कोणीही त्याच्याशी आर्थिक व्यवहार करू नये. केल्यास त्याची जबाबदारी वडील या नात्याने माझ्यावर अथवा माझ्या परिवारातील सदस्यांवर राहणार नाही याची नोंद घ्यावी. ही जाहीर नोटीस दिली,” असा मजकूर लिहिलेला आहे.

पाहा जाहीरात

हेही वाचा >> खतरनाक! पुणेरी पाटी सोडा “ही” कोकणी पाटी पाहा; कचरा टाकणाऱ्यांना दिली अशी धमकी की PHOTO पाहून पोट धरुन हसाल

प्रत्येक वडिलांनी ही जाहिरात नक्की वाचावी आणि पटल्यास आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्यावी. फक्त एकदा नाही, तर पुन्हा पुन्हा वाचावी आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगावी. ही जाहिरात सोशल मीडियावर lay_bhari_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही जाहिरात वाचून नेटकरीही भावूक झाले आहेत. अनेकांनी वडिलांवर ही वेळ आणल्यामुळे या मुलावर टीका केली आहे. एकानं म्हटलंय, “भावा संस्काराचा विषय केला म्हणून तुला कमेंट्स करीत आहे… कोणत्याच बापाला वाटत नाही आपला मुलगा वाया जावा. प्रत्येक बापाला वाटतं की, आपला मुलगा चांगला व्हावा. शेवटी ते मायबाप असतात आणि ही वेळ जर या बाबांवर आली असेल, तर त्यांनी योग्य तेच केलं आहे.” तर आाणखी एकानं, “कोणताच बाप मुलावर वाईट संस्कार करीत नाही. मुलगा मोठा झाला की, त्याला चांगलं-वाईट कळलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.