Heart Touching Video : आईला देवाचे रूप मानले जाते. जगात जे काम एक आई आपल्या मुलांसाठी करू शकते, ते इतर कोणी करू शकत नाही. नि:स्वार्थी प्रेम फक्त आईच करू शकते. आपल्या पोटच्या मुलांसाठी ती प्रत्येक धोका पत्करायला तयार असते. अडचणीच्या वेळी ती आपला जीव धोक्यात घालून, मुलांना संकटातून वाचवते. हे केवळ माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही घडते. पण, ज्या पिल्लाला खेळवत खेळवत लहानाचे मोठे केले, त्या पोटच्या पिल्लाचा अचानक मृत्यू झाल्यावर तिला किती वेदना झाल्या असतील याची फक्त कल्पना करा. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; जो पाहिल्यानंतर तुमचेही डोळे ओलावल्याशिवाय राहणार नाहीत.

हृदय पिळवटून टाकणारे दृश्य

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीला स्मशानभूमी किंवा दफनभूमीपर्यंत नेण्यासाठी चार खांदे असतात. पण, एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला, तर त्याला दफन करण्यासाठी कोणीही येत नाही. अशाच प्रकारे एक कुत्री अन् तिच्या पोटच्या मृत पिल्लाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कुत्री जड अंत:करणाने मृत पिल्लावर माती टाकून, तो मृतदेह गाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे.

Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
first day of School students emotional video goes viral
शाळेचा पहिला दिवस; आयुष्याच्या सुंदर इमारतीची पायाभरणी, ‘या’ चिमुकल्यांचा VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील शाळेचे दिवस
Little boy plays with stray dogs on waterlogged roads of Mumbai
रस्त्यावर साचलेल्या पाण्यात भटक्या कुत्र्यांसह खेळतोय चिमुकला, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
pune rains
“समुद्र नसल्याची पुणेकरांना खंत, म्हणून भाजपाने…”, पहिल्या पावसानंतरची दयनीय स्थिती पाहून जयंत पाटलांचा टोला
Katraj Kondhwa road, Four girls drowned pune
कात्रज-कोंढवा रस्त्यावर खड्ड्यात साचलेल्या पाण्यात चार मुली बुडाल्या, एकीचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तीन मुली बचावल्या
Ever wondered why some leftover foods taste better the next day but not all read what nutrition said
भाजी, डाळ शिळी झाल्यावर आंबट लागते; पण चिकन, मच्छी करीची चव वाढते, असे का? तज्ज्ञांकडून ऐका नेमकी प्रक्रिया
rahul gandhi latest news
काफी गर्मी है! उन्हामुळे त्रासलेल्या राहुल गांधींनी भर सभेत डोक्यावर ओतलं थंड पाणी; पाहा व्हिडीओ
A woman Instantly make vermicelli
“किती छान!” काकूंनी झटपट बनवल्या हातावरच्या शेवया, Viral Video पाहून बालपणीच्या आठवणी झाल्या जाग्या

व्हिडीओ पाहताना डोळे येतील भरून

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, कुत्री आपल्या मृत पिल्लाला तोंडात धरून, पायाने कशी माती खोदत आहे; जेणेकरून ती त्याला पुरू शकेल. सुरुवातीला हे दृश्य पाहून तुम्हाला समजणार नाही की, ती नेमके काय करीत आहे; पण नंतर जेव्हा ती खड्डा खणून, त्यात पिल्लाला ठेवते तेव्हा ती काय करत होती ते तुम्हाला समजते. हे करताना त्या आईच्या काळजाला काय वेदना झाल्या असतील याची कल्पना करून डोळे भरून येतील.

पोलिसाच्या हाताला चावे, गणवेश फाडला अन् शिवीगाळ करीत…; मद्यपी महिलांचा भररस्त्यात धिंगाणा, विरारमधील घटनेचा VIDEO व्हायरल

डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडीओ @Gulzar_sahab नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘कोणत्याही आईसाठी हा सर्वांत जास्त वेदनादायी प्रसंगी आहे; मग तो माणूस असो वा प्राणी.’ अवघ्या २२ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत २८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे; तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाइकही केले आहे.

हा भावनिक व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावनांची स्वतःची जागा असते.” दरम्यान, काही युजर्सनी या कुत्रीच्या पिल्लाला श्रद्धांजली अर्पण केली आहेत. तर, काही युजर्सना हा व्हिडीओ पाहून खरेच रडू कोसळले.