Viral video: आई ही आई असते. आई आणि मुलाचे नाते हे जगावेगळे असते. आई आपल्या मुलाच्या सुखासाठी आणि संरक्षणासाठी वाट्टेल ते करते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील त्याच्या आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. माणूस वयाने कितीही लहान असला किंवा मोठा असला तरी त्याला नेहमीच त्याच्या आई-वडिलांच्या सहवास आणि प्रेमाची ओढ असते. आई-वडिलांकडून मिळालेले प्रेम, शिकवण लहानपणापासूनच मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. परंतु, अनेकदा हे सुख प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन लहान मुलांना त्यांची आई न कळत्या वयातच सोडून गेली.

आईच्या प्रेमाची भूक प्रत्येक लेकरामध्ये असते. आईने आपल्याला जवळ घ्यावं, जीव लावावा असं प्रत्येक लहान मुलाला वाटतं. त्याच्या आयुष्यातील हे क्षण असे असतात, ज्यात त्याला आईचा सहवास सर्वात जास्त वेळ लाभतो. परंतु, कधी कधी काहींना हे सुख अनुभवायला मिळत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नकळत्या वयात आपली आई आपल्याला सोडून गेलीय हे सुद्धा कदाचीत या लहान मुलांना कळत नाहीये. दोघांची आई त्यांना सोडून या जगातून गेली असल्याचे समजते. आई गेली पण तिचा सहवास काही मुलांच्या हृदयातून गेला नाही आणि म्हणूनच फार निरागसतेने ते तिची भेट घेण्यासाठी तिच्या कबरीजवळ पोहचतात. यावेळी त्यांच्या हातात त्यांना शाळेतून मिळालेला रिपोर्ट कार्ड असतो. व्हिडिओमध्ये मुले त्यांच्या आईच्या कबरीजवळ प्रार्थना करताना, त्यानंतर त्यांचे प्रगतीपुस्तक घेऊन तिच्या शेजारी बसताना दिसतात जे पाहणे फारच भावनिक ठरते. मुलांचा निरागसपणा त्यांच्या मनात असलेलं आईच जिवंत प्रेम आता यूजर्सना भावूक करत आहे. व्हिडिओ आपल्याला आपल्या आयुष्यातील आईचं महत्त्व नव्याने समजावून सांगते.हा भावनिक व्हिडीओ खूप व्हायरल होत असून, या व्हिडीओवरील कॅप्शनमध्ये “देवा काहीच देऊ नकोस फक्त कुणाची आई हिरावू नकोस”, असं लिहिण्यात आलेलं आहे. या चिमुकल्यांचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील नेटकरीही हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील mohd_sarwat_khan या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ अनेक नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करीत आहेत. एकानं लिहिलंय, “असे व्हिडीओ बघितले की, डोळ्यांत पाणीच येतं.” दुसऱ्यानं लिहिलंय, किती निरागस लेकरू आहे.” “देवा कुणाचीच आई हिरावू नकोस”