Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा बाप-लेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक तरुण म्हणेल वडिलांच्या चेहऱ्यावरील या आनंदासाठी कष्ट करायचेत. हा व्हिडीओ पाहून तुमचाही उर आनंदाने भरुन येईल.

एकीकडे शेती शेती मालाला मिळत नसलेला भाव त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीच अश्रू पहायला मिळतात. कष्ट पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमीच समस्यांचे बांध असतात. मात्र, हे सर्व करत असताना शेतकऱ्याचं पोरगं मात्र मोठी मोठी स्वप्न पाहतं. स्पर्धा परिक्षा, कलेक्टर, ऑफिसर, सरकारी नोकरी. अशाच एका शेतकऱ्याच्या मुलानं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं.

जेव्हा लेक आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करतो तो दिवस

वडिलांनी त्याच्यासाठी आयुष्यभर केलेले कष्ट त्याच्या डोळ्यासमोर उभे राहतात, तर वडिलांच्या कष्टाचं चीज केल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. दोघेही बाप-लेक ज्या क्षणाची वाट बघत होते, जे स्वप्न पाहिलं होतं ते अखेर पूर्ण झालं होतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगा एसीपी झाल्यानंतर त्याचा सन्मान करण्यासाठी त्याला एका कार्यक्रमात आमंत्रीत केलं आहे. यावेळी या मुलानं सोबत आपल्या आई-वडिलांनाही स्टेजवर नेलं आणि त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय आई-वडिलांना दिलं. पुरस्कारही आई-वडिलांना दिलां. वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मुलं अभ्यास करतात, स्वप्न पाहतात, आणि जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरतं तेव्हा आयुष्यभराचे कष्टाचं फळं मिळाल्याची भावना या व्हिडीओमध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C8Mt3kQyYaD/?igsh=eWN3ZW14Zjd6Yzk4

हेही वाचा >> VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा

हा व्हिडीओ पाहून नेटीही भावूक झाले आहेत तर अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत. बापनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत. नेटकऱ्यांच्याही हा व्हिडीओ चांगलाच पसंतीस उतरला असून नेटकरी भावूक झाले आहेत. नेटकरी व्हिडीओवर भावनिक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, बापाच्या कष्टाचं चीज झालं. तर दुसऱ्या एकाने शेवटी संघर्षाचं फळ मिळालं अशी कमेंट केलीय.