Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात; तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहीत आहे की, आई-वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यांसमोर ठेवून काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच बाप-लेकाचा एक भावूक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक तरुण म्हणेल की, वडिलांच्या चेहऱ्यावरील या आनंदासाठी कष्ट करायचेत. दरम्यान, आपला लेक ज्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचला त्यांना न विसरता, वडिलांनी मुलाच्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा क्षण बघून तुम्हीही म्हणाल अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करणारी ही शेवटची पिढी.

लेक पोलीस झाल्यानंतर वडिलांच्या डोळ्यांसमोर त्याच्यासाठी आयुष्यभर केलेले कष्ट उभे राहतात आणि त्या कष्टांचं चीज मुलानं केल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर दिसतो. दोघेही बाप-लेक ज्या क्षणाची वाट बघत होते, जे स्वप्न पाहिलं होतं ते अखेर पूर्ण झालं होतं. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून, ते व्हिडीओतील मुलाचं तोंडभरून कौतुक करीत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगा पोलीस झाल्यानंतर त्याच्या अकॅडमीमध्ये आई-वडिलांना बोलावण्यात आलं होतं. तेव्हा मुलाबरोबरच त्याच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वडील मुलाच्या शिक्षकांकडे कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून पाया पडू द्यावे म्हणून विनंती करताना दिसत आहेत. मात्र, शिक्षक त्यांना असं करण्यापासून रोखत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलाच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पुणेकरांनो ट्रेकिंगला जाताय? पाण्याचा प्रवाह कसा वाढला पाहा; अडकलेल्या तरुणाची अवस्था पाहून घाम फुटेल

आयुष्यभराच्या कष्टाचं फळ मिळाल्याची भावना या व्हिडीओमध्ये वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर tiger_academy_mirajgaon नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटीही भावूक झाले आहेत आणि या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. बापानं कष्ट करावेत आणि पोरांनी त्याचं मोल करावं, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरला असून, ते भावूक झाले आहेत. नेटकरी या व्हिडीओवर भावनिक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे की, बापाच्या कष्टाचं चीज झालं. तर, दुसऱ्या एकानं शेवटी संघर्षाचं फळ मिळालं, अशी कमेंट केलीय.