Premium

या आनंदापुढे सगळं फिकं; मुलाला पोलिसांच्या गणवेशात पाहून आईला अश्रू अनावर; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

Viral video: जेव्हा लेक पहिल्यांदा वर्दीत आईला भेटतो, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Son Becomes The police Officer mother And Son Get Emotional
जेव्हा लेक पहिल्यांदा वर्दीत आईला भेटतो

inspirational story: आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये आई मुलाला वर्दीमध्ये पहिल्यांदा पाहते आणि मुलगा आईला पहिल्यांदाच वर्दीमध्ये सलाम करतो. यावेळी माय-लेकाची झालेली भेट प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ते व्हिडीओतील मुलाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.

आई-वडिलांनी कष्ट करावं अन् पोरांनी मोल करावं!

एखादी गोष्ट पुर्ण करण्यासाठी अनेकजण शेवटपर्यंत जिद्दीने प्रयत्न करतात. त्यामध्ये प्रत्येकाला यश मिळतचं असं नाही. ग्रामीण भागात पोलिस भरती आणि आर्मी भरती करणाऱ्य़ा तरुणांची संख्या अधिक आहे. प्रत्येकवर्षी स्वप्न साकार करणाऱ्या तरुणांचं सुध्दा प्रमाण अधिक आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगा आर्मीचं ट्रेनिंग पूर्ण करुन आल्यानंतर आईच्या चेहऱ्यावरचा समाधान आणि आनंदअश्रूच सर्वकाही सांगून जात आहेत. मुलाला पाहून आईला अश्रू अनावर झाले असून त्यांनी मुलाला कडकडून मिठी मारली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की “या आनंदापुढे करोडो रुपये फिके पडतील”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; किंकाळ्या, धावपळीचा थरारक VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा माय-लेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heart warming son becomes the police officer mother and son get emotional viral video on social media aarmi bharti selection srk

First published on: 07-12-2023 at 12:05 IST
Next Story
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पार्सल अन् वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद! बॅडमिंटन स्टार सात्विकसाईराज रंकीरेड्डीने शेअर केला हृदयस्पर्शी VIDEO