Elderly Mother Left at Old Age Home: इंटरनेटवर सतत आनंदी, हसरे आणि प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने अनेकांना थक्क करून टाकले आहे. एका वृद्ध महिलेची, जिने संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी समर्पित केले, तिच्या डोळ्यांतील निराशा आणि गालांवरून पडणाऱ्या अश्रूंनी पाहणाऱ्या प्रत्येकाचे हृदय गलबलून गेले. या महिलेला तिची मुलगीच वृद्धाश्रमात सोडतेय आणि ती असहाय महिला आपला चेहरा आपल्या जुन्या ओढणीने लपवत असल्याचे दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, एक मुलगी आईला घेऊन वृद्धाश्रमात आली. तिथल्या उपस्थित लोकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्याबाबतच कारण विचारले असता, मुलीचे उत्तर ऐकून सगळे थक्क झाले. ती म्हणाली, “घरात जागा कमी आहे आणि मी आईची काळजी घेऊ शकत नाही.” ही एक वाक्य तिच्या आईला अगदी लाचार बनवणारे भयंकर ठरले.

आईला ते शब्द ऐकल्यानंतर दु:खाने तिचे डोळे भरून आले; पण ती हतबल असल्याने गप्प राहिली, फक्त आपल्या जुन्या ओढणीने डोळे पुसण्याशिवाय तिच्या हाती काही नव्हते. तिने कधी ओरडून काही सांगितले नाही की ती अन्य काही बोलली नाही. एवढे होऊनही तिच्यातील आईची ममता आपल्या मुलीच्या हितासाठी प्रार्थना करीत होती. पण, तिच्या अश्रूंमध्ये समाजाच्या घसरत जाणाऱ्या नैतिकतेची वेदना स्पष्ट दिसत होती.

व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच, अनेकांनी त्या मुलीवर टीका केली. “घरात जागा नाही की, हृदयात जागा नाही? जिनं आपल्याला लहानचं मोठं करंन वाढवले, तिच्यासाठी थोडीही जागा नाही का?” अशा कमेंट्स पाहायला मिळाल्यां. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले, “हे आजच्या समाजातील सर्वांत भयंकर दृश्य आहे. देवानं अशी मुलं कोणालाही देऊ नयेत.”

काहींनी म्हटले, ही खूप वेदनादायक आणि विचार करायला लावणारी घटना आहे. ज्या आईने संपूर्ण जीवन आपल्या मुलांसाठी दिले, त्या आईसाठी ‘घरात जागा नाही’ असे म्हणणे म्हणजे फक्त एका व्यक्तीचीच नाही, तर आपल्यासारख्या समाजाच्या नैतिकतेचाही पराजय आहे. अनेकांनी तर त्या आईला स्वतःच्या घरी घेण्याची ऑफर दिली.

व्हिडीओच्या सत्यतेची स्वतंत्र पुष्टी करण्यात आली नसली तरी त्या दृश्याने लोकांच्या हृदयावर खोल ठसे उमटवले आहेत. काही तज्ज्ञ म्हणतात की, हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असण्याची शक्यता आहे; पण त्यातून मिळणारा संदेश अत्यंत भावनिक आणि जागरूकता वाढवणारा आहे.

हा व्हिडीओ आपल्या प्रत्येकाला एक विचार करायला लावतो – जे पालक जन्मापासून आपल्या मुलांसाठी सर्व काही सोडतात, जे त्यांच्या प्रत्येक इच्छा, आनंद, स्वप्नांचा त्याग करतात, त्यांना वृद्धावस्थेत तरी प्रेम आणि आदराचा अधिकार मिळायला हवा, नाही का?

येथे पाहा व्हिडीओ

तुम्ही काय विचार करता? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये शेअर करा. कारण- ही फक्त एका आईची गोष्ट नाही, तर त्यामुळे आपल्या समाजातील एक वेदनादायक वास्तव दिसून येते.