Video : घर वाचवण्यासाठी ओरांगउटानची केविलवाणी धडपड

काळीज पिळवटून काढणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढती जंगलतोड आणि पामची शेती यामुळे त्याचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आलाय.

(इंटरनॅशनल अॅनिमल रेस्क्यू / फेसबुक)

माणूस हा पृथ्वीवरचा सर्वात बुद्धीमान प्राणी म्हणून गणला जातो. पण माणूस जितका बुद्धीमान तितकाच तो क्रूरही आहे. निसर्गानं आपल्याला भरभरून दिलं पण, आपण मात्र निसर्गाला अक्षरश: ओरबाडलं. आपल्या स्वार्थासाठी अनेक प्राणी, पक्ष्यांचे जीव धोक्यात घातले, स्वत:चं घर बांधण्यासाठी आपण या मुक्या जीवांची घरं उद्ध्वस्त केली. गेल्या आठवड्यात जागतिक पर्यावरण दिन पार पडला आणि याच पार्श्वभूमीवर ‘इंटरनॅशनल अॅनिमल रेस्क्यू’नं काळीज पिळवटून काढणारा व्हिडिओ शेअर केला आहे. आपलं घर वाचवण्यासाठी सुरू असलेली ओरांगउटानची केविलवाणी धडपड पाहून अनेकांच्या काळजात चर्र होत होतं.

हा व्हिडिओ २०१३ मध्ये चित्रित करण्यात आला होता. पाच वर्षांनंतर हा व्हिडिओ सर्वांसमोर आणून जंगलतोड रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इंडोनेशियातला हा व्हिडिओ असल्याचं समजतं आहे. इंडोनेशियात मोठ्या प्रमाणात आढळणारे ओरांगउटान आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वाढती जंगलतोड आणि पामची शेती यामुळे ओरांगउटानचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. ओरांगउटानचा नैसर्गिक अधिवास वाचवण्यासाठी आणि प्राण्यांचं संवर्धन करण्यासाठी अनेक आंतराष्ट्रीय संस्था गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.

आपलं घर कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला की आपल्याला किती त्रास होतो, आपण जीवानीशी लढतो मग या प्राण्यांचं दु:ख न समजण्याइतके आपण निदर्यी कसे झालो इतकाच प्रश्न आता उरला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heartbreaking video of orangutan try to save his home

ताज्या बातम्या