Viral video: आज सर्वत्र बालदिन साजरा केला जात आहे. बालदिन हा केवळ एक उत्सव नसून, मुलांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे, त्यांचे बालपण जपणे आणि त्यांना स्वातंत्र्य व कल्पनाशक्तीने वाढण्यास मदत करण्याची आठवण करून देतो. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल देवा असं बालपण कुणाच्याच वाट्याला नको.

माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. सध्या अशाच एका चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. निरागस बालपण चिरडलेलं पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मोलमजुरी करणाऱ्या आईने आपल्या निष्पाप लहान मुलांना ऊसामध्ये ठेवलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. आईच्या या कृतीमागे क्रूरता नसून असहायता आणि गरीबीचा आक्रोश आहे.परिस्थितीनुसार आलेली गरिबी आणि याच गरिबीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करणाऱ्या महिलेचं आणि तिच्या लेकराचं भयान वास्तव्य पाहायला मिळालं आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ bhannat__news नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये यांच्यापेक्षा वाईट दिवस आहेत का तुमचे? असं लिहलं आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “गोड उसाची कडु कहाणी” “परिस्थितीवर मात करून दाखवणार संघर्ष” “ग्रामीण भागातील शेकऱ्यांना ऐक विनंती वर्षभरातील जुने कपडे व स्वेटर टाकून न देता अश्या गरजू मुलांना देण्यासाठी जपून ठेवत जा.” “आपल्या शेतात राबणाऱ्या लोकांना अर्ध्या पोटी रहाणाऱ्या पोटभार जेवण्याची माणुसकी दाखवा” अशा अनेक प्रतिक्रिया लोक देत आहेत.