Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती तुफान डान्स करताना दिसत आहे. तुम्ही कधी हत्तीला डान्स करताना पाहिले का? जर नाही, तर हा व्हिडीओ पाहा.अनेक जण सोशल मीडियावर प्राण्यांवरील प्रेम व्यक्त करत पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. कुत्रा मांजरीचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण हत्तीचा असा डान्स करतानाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. व्हायरल होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात.काही व्हिडीओ घाबरवणारे असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात.सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातातआणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलाय आणि शेअरसुद्धा केला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्येही हा हत्ती आपले शरीर हलवत तालासुरात नाचताना दिसला. हे दृश्य पाहून सर्वच थक्क झाले. हत्तीचे हे नृत्य आता अनेकांची मने जिंकत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती हत्तीच्या समोर गाण्यावर डान्स करत आहे. यावेळी हत्ती सुरुवातीला फक्त या व्यक्तीला पाहत असतो, मात्र जसा तो व्यक्ती हत्तीच्या दिशेने हातवारे करत पुन्हा डान्स करतो तेव्हा हत्तीही त्याला प्रतिसाद देत नाचू लगातो. गाण्याच्या तालावर हत्तीही नाचताना दिसत आहेय.
पाहा व्हिडीओ
सोसळ मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि लोक व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “अरे हे खूप क्यूट आहे.”
