scorecardresearch

Premium

व्हिलचेअरवर बसलेल्या आईला हातात उचलून विमानात बसवताना दिसला तरुण, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून लोकांचे अश्रू झाले अनावर

या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये, मुलगा व्हिलचेअरवर बसलेल्या आपल्या आईला विमानातील सीटवर आरामात बसण्यासाठी मदत करत असल्याचे दिसून येते.

video of son lifts disabled mom from wheelchai to board plane
व्हीलचेअरवर बसलेल्या आईला हातात उचलून विमानात बसवताना दिसला तरुण (फोटो सौजन्य – GoodNewsCorrespondent, एक्स (ट्विटर)

अनेकदा असे व्हिडिओ इंटरनेटवर दिसतात, जे हृदयस्पर्शी असतात आणि तुम्हाला प्रेरणाही देतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईला आपल्या हातात उचलून घेऊन उड्डाणापू्र्वी विमानामध्ये बसवताना दिसत आहे. आई लेकाचे प्रेम आणि वात्सल्य दर्शवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण या व्हिडिओमध्ये एका मुलाच्या मनात आईसाठी असलेले प्रेम आणि समर्पण दिसत आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून अश्रू अनावर झाले आहेत.

हे नाते अनमोल आहे
या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये, मुलगा व्हिलचेअरवर बसलेल्या आपल्या आईला विमानातील सीटवर आरामात बसण्यासाठी मदत करत असल्याचे दिसून येते. व्हिडिओच्या सुरुवातीला एक तरुण आपल्या आईला हातात उचलून घेतो. अतिशय काळजीपूर्वक विमानात चढताना दिसत आहे. हा तरुण लहान मुलांसारखे आईला आपल्या हातात उचलून घेतो आणि तिला सीटवर बसवतो. त्या आई आणि मुलाचा आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे. महिलेच्या गरोदरपणात असल्यापासून आतापर्यंत काढलेले फोटो एकत्र करून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा – अननसाचे मोमो’ कधी खाल्ले आहेत का? नसेल तर ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहा, विचित्र प्रयोग पाहून संतापले लोक

हेही वाचा – हौस पडली महागात! आकाशपाळण्यात अडकले तरुणीचे केस; जत्रेतील थरारक व्हिडीओ होतो व्हायरल

X (ट्विटर) वर हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ”त्याच्या आईने त्याला ९ महिने संभाळले आहे. आता जेव्हा तिला मदतीची गरज आहे तेव्हा तिचा मुलगा तिला घेऊन जाण्यास मदत करतो आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे आणि लोक या मुलाचे खूप कौतुक करत आहेत. मुलाचे आईसाठीचे समर्पण पाहून सोशल मीडियावर लोक भावूक होत आहेत आणि अशा कर्तृत्ववान मुलाचे कौतुक करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heartwarming video of son lifts disabled mom from wheelchair to board plane snk

First published on: 30-09-2023 at 20:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×