घरात आजी-आजोबा असले की, घरातील वातावरण वेगळंच असतं. आई-बाबांपैकी कोणी ओरडलं की मायेचा हात फिरवायला आजी-आजोबा तत्पर असतात. आजी, आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. नातवाचे पहिले मित्र हे आजी आजोबाच असतात. नात्याची खरी जडण घडण तिथूनच होत असते. आजी आणि नातवाचे नाते खूप सुंदर असते. आजीशिवाय नातवाचे बालपण हवे तसे जात नाही. आपल्या आयुष्यातील पहिले शिक्षक म्हणजे आपले आजी-आजोबा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालपणात, बहुतेक सर्वजण आपला बराचसा वेळ आजी-आजोबांच्या कुशीत घालवतात आणि जेव्हा आजी-आजोबा घरात नसतात तेव्हा संपूर्ण घर खाली-खाली वाटतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एका मुलाचा जो त्याच्या आजीपासून दूर राहायचा आणि जेव्हा खूप दिवसांनी आपल्या कॅन्सरग्रस्त आजीला भेटतोय तेव्हा….खूप दिवसांनी आजीला पाहताच त्या मुलाला खूप रडू येते. व्हिडीओमध्ये काय दाखवण्यात आले आहे, जाणून घेऊया…

(हे ही वाचा : काय! चक्क दोऱ्याने पलटले ऑमलेट!! Viral Video मधील ‘ही’ ट्रिक पाहून कपाळावर माराल हात )

आजीला पाहून मूल रडायला लागले

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वृद्ध महिला व्हील चेअरवर बसलेली दिसत आहे. त्यांचा नातू खूप दिवसांनी त्यांना भेटायला आला आहे. लहान मुलगा आपल्या आजीला समोर पाहताच तो आपल्या वडिलांचा हात सोडतो आणि आजीकडे धावत जातो. आजीची अशी अवस्था पाहून तो खूप रडू लागतो. नातवाला रडताना पाहून आजीही रडायला लागते. यानंतर आजी आपल्या नातवाच्या डोक्याला हात लावून त्याला शांत करते. व दोघेही आजी आणि नातू एकमेकांशी बोलू लागतात.

येथे पाहा व्हिडिओ

व्हिडिओ पाहून लोक भावूक झालेत

आजी आणि नातवाचे अतूट प्रेम पाहून लोक खूप भावूक झाले. आजी-आजोबांशिवाय बालपण व्यर्थ आहे, असे म्हणतात. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @Good News Movement नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या संख्येनी पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांच्या आजी आणि त्यांचे बालपण आठवले. कमेंट बॉक्समध्ये लोक आजीसोबत घालवलेले क्षण आठवत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heartwarming video showcasing an emotional reunion of a woman battling cancer with her grandson has viral social media pdb
First published on: 23-02-2024 at 13:40 IST