संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सध्या कोकणासह अनेक राज्यांतील नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रहदारीचे रस्ते, महामार्ग पाण्याखाली गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जातात. मात्र, तरीही लोक फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडतात. यावेळी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांत गाडी चालवण्याचे जीवघेणे धाडस करतात. पण, हेच धाडस एका कारचालकाच्या चांगलेच जीवावर बेतले आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका गावातून जाणाऱ्या छोट्या नदीला अक्षरश: पुराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ही नदी पाण्याच्या प्रचंंड प्रवाहाने दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीच्या मधून जाणारा रस्ताही पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक वाहने सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभी आहेत, मात्र तरीही एका अतिउत्साही कारचालकाने पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावर कार नेली, त्यानंतर पुढे जे काही घडले ते फारच भयानक होते.

Pune People Are You Planning To Visit Tamhini Ghat This Weekend Wait First Watch This Video
ताम्हिणी घाटात बाईक घेऊन जाण्याआधी ‘हा’ VIDEO पाहा; रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांचं काय झालं बघाच
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
a woman was lucky was rescued by local people at waterfall shocking video goes viral
प्रत्येकवेळी कोणी जीव वाचवायला येणार नाही! नशीबवान होती महिला, मदतीला धावून आले लोक; पाहा थरारक VIDEO
young woman was coming down the stairs her foot slipped and she fell directly into the valley
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ पायऱ्या उतरत होती तरुणी, पाय घसरला अन् थेट दरीत…,थरारक घटनेचा Video Viral
Shocking video Water Increased in waterfall Many People Drowing In Water Scary Video
अवघ्या ५ सेकंदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र, ‘हा’ एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच
three workers injured in accident while demolishing part of bridge in chiplun accident video viral
चिपळूणमधील थरारक अपघाताचा VIDEO; उड्डाणपुलाचा खांब तोडताना रोप तुटला अन् तीन कामगार थेट…; भीतीदायक दृश्य
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

पाहता पाहता ती कार अक्षरश: डोळ्यादेखत नदीच्या पाण्यात वाहून गेली. पाण्याच्या प्रवाहात कार काही अंतर पुढे वाहत गेली, यावेळी कारमधील दोन जण जीव वाचवण्यासाठी खिडकीमधून बाहेर आले आणि कारच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हॉस्टेलमधील किळसवाणा प्रकार; चटणीत तरंगताना दिसला चक्क जिवंत उंदीर, विद्यार्थ्यांचा संताप; Video व्हायरल

नदीचा प्रवाह एवढा वाढला की, वाहनात बसलेले दोन जण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले. यावेळी जीव वाचवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. कारच्या काचा उघडून ते बाहेर पडले, पण पुढे त्यांचा जीव वाचू शकला की नाही हे अद्याप समोर आलेले नाही.

या व्हिडीओवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले की, महागडी गाडी घेत काही जण स्वत:ला देव समजतात, त्यांच्यासाठी हा चांगला धडा आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, डर के आगे जित है और होशियारी के आगे मौत है; तिसऱ्या एका युजरने लिहिले की, कार घेऊन स्वत:ला काही जण बाप समजतात. आणखी एका युजरने लिहिले की, तुम्ही जेव्हा निसर्गाला चॅलेंज करता, तेव्हा अशा घटना घडतात; तर काहींनी पाण्याशी खेळू नका असा सल्ला दिला आहे.