VIRAL VIDEO : आता कोंबड्यावरही चढला ‘Pushpa’ फिवर, ‘Srivalli’ गाण्यावर त्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येकावर सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिवर चढलाय. यात कोंबडा सुद्धा मागे नाही. या व्हिडीओमध्ये चक्क कोंबड्याने सुद्धा अल्लू अर्जुनच्या हुबेहुब हुक डान्स स्टेप्स कॉपी केल्या आहेत. विश्वास नसेल होत तर हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

Pushpa-Murga-Viral-Video
(Photo: Instagram/ comedynation.teb)

गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट देशभर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सची सगळीकडे चर्चा आहे. त्याचे डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन आले आहे, तेव्हापासून अशा व्हिडीओंची संख्याही वाढली आहे. ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ या चित्रपटातील एका गाण्याच्या हुक डान्स स्टेप्सवर सर्वाधिक व्हिडीओ बनवले जात आहेत. सध्या या गाण्यावरचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की या गाण्याची क्रेझ आता माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांमध्ये होऊ लागली आहे. या गाण्यावर चक्क कोंबड्याने डान्स केलाय. कोंबड्याचा हा डान्स पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. चला हा व्हायरल व्हिडीओ पाहूया.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कोंबडा अंगणात फिरताना दिसत आहे. अचानक तो ‘पुष्पा’ चित्रपटातल्या ‘श्रीवल्ली’ गाण्यात ज्याप्रमाणे सुपरस्टार अल्लू अर्जुनने डान्स केलाय, अगदी त्याच्या या हुक स्टेप्स फॉलो करत या कोंबड्याने डान्स केलाय. तो बराच काळ श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना दिसून येतोय. प्रथमदर्शनी त्याची पावले पाहून तुम्हाला समजेल की कोंबडा काय करत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स बघून तो अल्लू अर्जुनचा खूप मोठा फॅन असल्याचं जाणवतं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ऐन हिमवर्षावात माणसाला रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्याची इच्छा झाली… पण टाळे पाहून त्याने गुडघे टेकले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रिपोर्टरने घेतली ‘बिहारी बॉय’ची मुलाखत, मुलाच्या मजेशीर उत्तराचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ comedynation.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर या कोंबड्याला ‘पुष्पा कोंबडा’ नावाने ओळखू लागले आहेत. मूळ गाणं श्रीवल्लीमधल्या सुपरस्टार अल्लू अर्जुनप्रमाणेच हा कोंबडा एक पाय लंगडत हुक स्टेप करताना पाहून लोक हैराण होऊ लागले आहेत.

आणखी वाचा : ‘हा’ माणूस एकाच वेळी ५० ऑम्लेट खातो, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण

सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाख ३० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. तसंच २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहून तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह लोकांना आवरता येत नाहीय. या व्हिडीओवर लोक एकामागून एक कमेंट्सही शेअर करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hen loved pushpa film srivalli dance steps cock copy allu arjun song video viral on internet prp

Next Story
Viral Video: नवरदेव नकळत उचलत होता लग्नाच्या स्टेजवर पडलेली दोन हजारांची नोट, त्यानंतर वधूने केलं असं काही की…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी