scorecardresearch

video: मुसळधार पाऊस, चिखलात रुतलेल्या हत्तीची मृत्युशी झुंज आणि अखेर…

viral video : हत्तीने स्वत:चा आणि पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी केलेला हृदयस्पर्शी संघर्ष या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय.

mother elephant
चिखलात रुतलेल्या हत्तीचं अनोखं रेस्क्यू (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हत्तींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी त्यात ते आपल्या मजेशीर स्टाईलने लोकांना हसवत असतात, पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हत्तीने स्वत:चा आणि पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी केलेला हृदयस्पर्शी संघर्ष या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर हत्ती आणि पिल्लाच्या रेस्क्यूचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हत्तीची मृत्युशी झुंज –

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, थायलंडमध्ये मुसळधार पावसात आलेल्या वादळामुळे हत्ती आणि पिल्लू ७ फूट खोल खड्ड्यात पडलं आहे. आजूबाजूला खूप पाऊस पडल्यामुळे सर्वत्र चिखल झालेला आहे. अशा परस्थितीत हत्ती आणि हत्तीच्या पिल्लाला बाहेर येता येत नाहीये. बराच वेळ हत्तीचा बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरु असताना पशुवैद्य अधिकारी त्या ठिकाणी दाखल होतात आणि हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. मुसळधार पावसामुळे त्यांच्या या बचावकार्यात बऱ्याच वेळा व्यत्यय येतो . चिखल खोदून पशूवैद्य अधिकारी दोघांना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी ड्रोनचाही वापर करत आहेत. दरम्यान हत्ती रागीट प्राणी आहे आपल्या माहितीये. हे सगळ सरु असताना हत्तीला प्रचंड राग येतो आणि हत्ती खड्ड्यातच जरोदार टक्कर देतो यानंतर क्षणातच हत्तीला चक्कर येते. अशा परिस्थितीत पशुवैद्य अधिकाऱ्यांच्या तीन तासाच्या प्रयत्नानंतर अखेर हत्तीला आणि पिल्लाला बाहेर काढलं. थोड्यावेळाने हत्तीला शुद्ध येते आणि हत्ती पिल्लाला घेऊन जंगलात निघून जातो.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – गोष्ट एका Part-Time युट्युबरची; ज्यूस विकून चालवतो युट्युब चॅनेल, प्रमोशनसाठी अनोखा जुगाड

आतापर्यंत या व्हिडीओला ८ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले असून अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी पशुवैद्य अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 10:45 IST

संबंधित बातम्या