कोकण हा भारतातील महाराष्ट्र राज्याचा किनारी विभाग आहे. कोकणाला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. कोकण हे उष्णकटिबंधीय समुद्रकिना-यासह पर्यटन क्षेत्र असले तरी येथील हिरवळ, खोल दरी, धबधबे यामुळे तुम्हाला स्वर्गच वाटतो.आता पावसाळा तोंडावर आला आहे, या दिवसांमध्ये तर कोकणातील सौंदर्य आणखीचं खुलुन येत. आपल्याला सगळ्यांना माहितीये की, कोकणात प्रचंड मुसळधार पाऊस असतो. मात्र, तुम्ही कधी हा विचार केलाय का की, एवढ्या प्रचंड पावसात कोकणातील घरं इतकी मजबूत कशी? कोकणात पावसात मातीची घरे कशी टिकतात? याचं प्रश्नांची उत्तर सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताय. सह्याद्रीच्या माथ्यावर असलेलं तांबेड नावाचं गवत, खार्वी, बांबू आणि नारळाची झावळी अशा नैसर्गिक वस्तू वापरुन भक्कम भिंती उभ्या करत कोकणातली ही घर उभी केली जातात. निसर्गातील ही रान माणसे आपल्या घरांना मुलांप्रमाणे जपतात. निसर्गाशी एकरुप होऊन त्याचं संगीत गात असतात. निसर्गाचा वापरच निसर्गाचं संवर्धन करायला माणसाला शिकवतो. कोकणात प्रचंड पाऊस असतो अशावेळी, हे पाणी घरांच्या भिंतीमध्ये झिरपु नये यासाठी कोकणात विशिष्ठ रचनेची घरे बांधली जातात. घरांना शेणानं संपूर्ण आतून-बाहेरुन सारवलं जातं. पाहा व्हिडीओ हेही वाचा - Video: ‘लालपरी’त महिला क्रांती, इतिहासात पहिल्यांदाच एसटीचं स्टेअरिंग महिलेच्या हाती! कोकण म्हटलं की नजरेसमोर येतो तो माडा-पोफळीच्या बागा. सुंदर समुद्र किनारा, काजू, आंब्याच्या बागायती, उंच-उंच डोंगर, गर्द झाडा-झुडपात लपलेले उंच डोंगर यामुळे एप्रिल-मे महिन्यात वाऱ्याच्या एखाद्या येणाऱ्या झुळुकीमुळे निर्माण होणारे आल्हाददायक वातावरण. मात्र आता झाडे कापण्याचं प्रमाण वाढल्यामुळे निसर्गाची हाणीही होतेय. कोकणाला आपलं कोकणपण टिकवून ठेवायचं असेल तर त्यात काही बदलही अपेक्षित आहेत. त्याकडे आपण सर्वांनीच विशेष लक्ष दिले पाहिजे. या वर्षीच्या उष्णतेने आपणाला जागं केलंय. त्याचा विचार आपण केला पाहिजे. शेवटी निसर्गापुढे आपण किती शहाणपणा करायचा, हे आपणच ठरवलं पाहिजे.