Hero Splendor+ Flex Fuel : भारतीय दुचाकी बाजारात आज एक नवा इतिहास रचला गेला आहे. प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पनं आपली पहिली फ्लेक्स-फ्यूल (Flex-Fuel Motorcycle) बाईक भारतीय बाजारात उतरवली आहे. देशभरात एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत चालली आहे. त्यामुळे स्वस्त आणि मायलेदार अथवा ईलेक्ट्रिक वाहनाकडे लोकांचा कल वाढला आहे. तर दुसरीकडे, वाहन उत्पादक कंपन्या आणि सरकारकडून नवीन इंधन आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच भारतातील सगळ्यात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या Hero MotoCorp ने इंधन आणि प्रदुषणावर आळा घालण्यासाठी Flex Fuel बाईक आणली आहे. Splendor+ आणि HF Deluxe चं Flex Fuel व्हर्जन लाँच केलं आहे. या दोन्ही बाईक आता E20 पासून ते E85 पर्यंत इथेनॉल मिश्रीत फ्यूलवर चालणार आहे. त्यामुळे आता पेट्रोलवर अवलंबून राहणे कमी होणार आहे.

Hero Splendor+ Flex Fuel कशी आहे?

नवीन Splendor+ Flex Fuel मध्ये आता 97.2 cc चं इंजिन दिलं आहे. जे आता E85 इंधनावर 6.3 kW इतकी पॉवर आणि 8.3 एनएम टॉर्क जनरेट करेल. या बाइकमध्ये Heroचं पेटेंटेड i3S ऑईल्ड स्टार्ट-स्टॉप टेक्नॉलॉजी दिली आहे, नवीन डिजी-एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ, ट्यूबलेस टाअर आणि Flex Fuel सपोर्ट करणार आहे. या बाईकमध्ये Black with Lime Yellow ग्राफिक्ससह रंग दिले आहे.

काय आहे ‘फ्लेक्स-फ्यूल’ तंत्रज्ञान?

हिरोच्या या नव्या फ्लेक्स-फ्यूल बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे इंधन पर्याय. ही बाईक केवळ पेट्रोलवर नाही, तर इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणार आहे. ही बाईक E20 (20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल) पासून ते थेट E100 म्हणजे 100% शुद्ध इथेनॉल पर्यंतच्या कोणत्याही मिश्रित इंधनावर सहज धावू शकेल.

काय आहे नव्या गाड्यांची किंमत?

विशेष म्हणजे हिरोने या नव्या फ्लेक्स-फ्युएल गाड्यांच्या किमती अतिशय परवडणाऱ्या ठेवल्या आहेत. एचएफ डिलक्स फ्लेक्स प्युएल (HF Deluxe Flex Fuel) दुचाकीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत केवळ ७२,७९२ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर स्प्लेंडर प्लस प्लेक्स फ्युएलची (Splendor+ Flex Fuel) एक्स शोरूम किंमत ८२,७१० रुपये ठेवण्यात आली आहे.

‘एचएफ डिलक्स’ की ‘स्प्लेंडर’

हिरो कंपनी आपले हे नवे आणि क्रांतिकारी फ्लेक्स-फ्यूल इंजिन नक्की कोणत्या बाईकमध्ये देणार, यावर सध्या ऑटो क्षेत्रात दोन वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. जानेवारी 2025 मध्ये पार पडलेल्या ‘भारत मोबिलिटी एक्स्पो’ दरम्यान हिरो मोटोकॉर्पने ‘HF Deluxe Flex-Fuel’ चा प्रोटोटाइप जगासमोर सादर केला होता. त्यामुळे कंपनी आज याच बाईकचे कमर्शियल मॉडेल लॉन्च करेल, अशी आशा अनेकांना आहे.