VIDEO : बाइकवर स्टंट करताना तोल गेला अन्… ; IPS ऑफिसरने व्हिडीओ शेअर करत स्टंट न करण्याचं केलं आवाहन

काही बाईकर्स संपूर्ण स्पीडनं गाडी पळवून स्टंट करताना अनेकदा तुमच्या नजरेस पडत असतील. असे बाईकर्स स्टंटच्या नादात कधीकधी आपला जीव सुद्धा धोक्यात घालतात. असाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

bike-stunt-viral-video
(Photo:Twitte/ Rupin Sharma IPS)

काही बाईकर्स संपूर्ण स्पीडनं गाडी पळवून स्टंट करताना अनेकदा तुमच्या नजरेस पडत असतील. असे बाईकर्स स्टंटच्या नादात कधीकधी आपला जीव सुद्धा धोक्यात घालतात. अनेकांचा तर जीवही जातो. या घटना वारंवार डोळ्यासमोर घडून सुद्धा मात्र अनेक बाईकर्स स्टंट करण्याची जोखीम उचलतात. असाच एक स्टंट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे येतील. कारण, स्टंट करण्याच्या नादात त्या व्यक्तीची जी अवस्था झाली ते पाहून लोक अक्षरशः ओरडू किंचाळू लागले.

तरुणांमध्ये स्टंटबाजीची प्रचंड क्रेझ आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. काही तरुणांना जिथे संधी मिळेल तिथे ते स्टंटबाजी करू लागतात. आपण कुठे स्टंट करतोय याचं सुद्धा त्यांना भान राहत नाही आणि मग त्याचे परिणाम काय होऊ शकतात? हे सांगणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघा, गर्दीच्या रस्त्यावरून एक तरुण दुचाकीवरून जात आहे. अचानक तो बाईकवर चकरा मारायला लागतो. या दरम्यान दोन्ही बाजूने वाहने ये-जा करत असतात. काही काळ सर्वकाही सुरळीत असतं. पण, अचानक पुढे घडलेला प्रकार पाहून सगळेच चक्रावून गेले. या व्हिडीओत स्टंट करणारा व्यक्ती थेट डंपरला जाऊन धडकतो आणि मग पुढे जे होतं त्यासाठी हा व्हिडीओ पाहाच….

हिरोची हिरोपंती निघाली….

हा व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक झाले असाल. हा व्हिडिओ ज्याने पाहिला त्याला धक्काच बसला. आता लोक हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक आवाहन करताना लिहिलं की, ‘असं करू नका, हिरोची हिरोपंती निघाली’. हा व्हिडीओ आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे आणि सतत प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

कधीकधी लोक धोकादायक स्टंट करताना आपला जीव देखील गमावतात. असं असूनही लोक यातून धडा घेत नाहीत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या बाईकरला सल्ला दिला आहे. एका यूजरनं लिहिलं, स्टंटबाजी करण्याच्या नादात लोकांना आपल्या जीवाचीही पर्वा राहात नाही. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, असे धोकादायक स्टंट करणं टाळायला हवं. इतरही अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heropanti nikal gayi live accident ka video accident video viral video google trends today ips shared omg video and said dont do this video went viral prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news