“हिंमत हारु नकोस,”आई-वडिलांचे मृत्यूपूर्वीचे ‘ते’ शब्द; दोन महिन्यांनी मुलीने बोर्डात पहिला क्रमांक मिळवला

तिने मे महिन्यात एकमेकांपासून काही दिवसांच्या अंतरावराने तिचे दोन्ही पालक कोविड १९ मुळे गमावले.

bhopal girl top in exam
तिचा १० वर्षांचा भाऊ एवढचं कुटुंब मागे राहिले (Photo:Twitter)

मागच्या वर्षापासून सुरु झालेल्या कोविड-१९ च्या प्रकोपामुळे अनेकांचे प्राण गेले आहे. अनेक लहान मुलांनी त्याने एक नाही तर दोन्ही पालक या रोगामुळे गमावले आहेत. अजूनही कोविड-१९चं संक्रमण सुरूच आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेतून सावरत वनिषा पाठक या मुलीने दहावीच्या परीक्षेत अव्वल गुण आणले आहेत. वनिषा पाठक ही मध्य प्रदेशच्या भोपाळची एक १६ वर्षीय मुलगी आहे. तिने मे महिन्यात एकमेकांपासून काही दिवसांच्या अंतरावराने तिचे दोन्ही पालक कोविड १९ मुळे गमावले. एकेकाळी हास्याने भरलेले तिचे घर उध्वस्त झाले होते. ती आणि तिचा १० वर्षांचा भाऊ एवढचं कुटुंब मागे राहिले.

दहावीच्या परीक्षेत अव्वल गुण

दोन महिन्यांनंतर, वनिषाने तिची दहावी सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली. सर्व अडचणी असूनही तिने परीक्षेत अव्वल स्थान मिळवले आहे. एनडीटीव्हीच्या मते, वनिषा पाठकने इंग्रजी, संस्कृत, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान आणि गणितामध्ये ९७ गुण मिळवले. ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. एनडीटीव्हीशी बोलताना ती म्हणाली की,“माझ्या पालकांच्या आठवणीने मला नक्कीच प्रेरणा दिली आणि आयुष्यभर मला ते प्रेरितचं करतील. पण सध्या माझा भाऊ मला प्रेरणा देणारा सर्वात मोठा स्त्रोत आहे. माझ्याकडे तो आहे आणि त्याच्यामुळेच मी सगळ करू शकतेय.”

पालकांची शेवटची आठवण

तिच्या पालकांच्या शेवटच्या आठवणीची आठवण करून देताना वनिषा म्हणाली की, जेव्हा तिने तिच्या पालकांना शेवटच्या वेळी पाहिले तेव्हा ते एकत्र हॉस्पिटलसाठी निघाले होते. ती सांगते,”माझ्या आईने मला सांगितलेली शेवटची गोष्ट म्हणजे ‘फक्त स्वतःवर विश्वास ठेवं… आम्ही लवकरच परत येऊ’. माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द होते ‘बेटा, हिमत रखना’.

वडिलांची इच्छा

“माझ्या वडिलांना मला आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये पाहायचे होते किंवा यूपीएससी क्रॅक करून देशाची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती. त्याचे स्वप्न आता माझे स्वप्न आहे.” असं ती सांगते. तिचे वडील आर्थिक सल्लागार होते आणि आई सरकारी शाळेत शिक्षिका होती. तिची आणि तिच्या भावाची काळजी आता तिचे मामा आणि मामी घेत आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Himmat rakhna said girls parents before death two months later she tops boards ttg

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या