Gautami Patil vs Hindavi Patil: महाराष्ट्राची पारंपरिक लोककला असलेली लावणी ही गेल्या अनेक दशकांपासून रसिकांचे मनोरंजन करत आली आहे. बदलत्या काळात हिप-पॉप, के-पॉपसारख्या आधुनिक नृत्यप्रकारांची क्रेझ वाढली असली, तरीही लावणीचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही.
आजच्या काळात लावणीच्या नावाखाली रील्सवर केवळ ग्लॅमर आणि उथळपणा पाहायला मिळत असल्याचा सूर अनेकदा उमटतो. मात्र, अस्सल लावणी सादर करणारे कलाकार दिवसेंदिवस कमी होत चालल्याची खंत अनेक जाणकार व्यक्त करतात. मात्र, अजूनही काही कलाकार पारंपरिक लावणी जपताना दिसतात आणि त्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
अशीच एक नृत्यांगना जी आपल्या नृत्यातून लावणीची खरी परंपरा जपण्यासाठी ओळखली जाते तिचा लावणी डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लावणी नृत्यांगणा हिंदवी पाटील (Hindavi Patil)अस्सल लावणी नृत्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हिंदवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला एक नवीन लावणीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून, तिची तुलना आता थेट लावणी क्वीन गौतमी पाटीलशी (Gautami Patil) केली जात आहे.
‘जाऊ द्या ना घरी’ गाण्यावर हिंदवी पाटीलचा कडक परफॉर्मन्स (Hindavi Patil Lavani Dance Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत, हिंदवी पाटील ‘जाऊ द्या ना घरी’ या प्रसिद्ध गाण्यावर लावणी नृत्य सादर केले आहे. पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून ती अफलातून नृत्य करताना दिसत आहे. ढोलकीच्या तालावर थिरकत ती चाहत्यांचे मन जिंकत आहे. तिच्या चेहऱ्यावरील सुंदर हावभाव आणि अदाकारीने नेटकऱ्यांना पुरते घायाळ केले आहे. कोणत्याही थिल्लरपणाशिवाय केवळ आपल्या दमदार नृत्याच्या जोरावर तिने या लावणीच्या नृत्य सादर केले आहे.
गौतमी पाटीलपेक्षा हिंदवी भारी! सोशल मीडियावर रंगली चर्चा (Gautami Patil vs Hindavi Patil)
या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘अस्सल लावणी विरुद्ध आधुनिक लावणी’ अशी चर्चा रंगली आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे थेट गौतमी पाटीलचा संदर्भ देत हिंदवी पाटीलचे कौतुक केले आहे. “ह्या पाटील ताईची बरोबरी दुसरी कोणतीच कलावंत करू शकत नाही,” असे म्हणत नेटकऱ्यांनी हिंदवीला पाठिंबा दिला आहे. हिंदवी पाटीलच्या बाबतीत नेटकऱ्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, “हिने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची पारंपरिक लावणी टिकवून ठेवली आहे.” काहींनी तर थेट मत मांडले की, “तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांनीही हिंदवीच्या या अस्सल लावणी नृत्याला सलाम केला पाहिजे, इतकी ताकद हिच्या नृत्यात आहे.”
नेटकऱ्यांकडून ‘लावणी सम्राज्ञी’चा किताब (Netizens Reaction on Viral Video)
हिंदवीच्या या लावणी नृत्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एकाने लिहिले, “सध्याच्या काळात हीच खरी लावणी कलाकार आहे.” तर दुसऱ्याने कौतुक करताना म्हटले, “अमृता खानविलकरसारख्या मोठ्या अभिनेत्रींनाही लाजवेल असे अप्रतिम आणि अलौकिक नृत्य हिने सादर केले आहे.” अनेकांनी तिला ‘लावणी क्वीन’ आणि ‘लावणी सम्राट’ अशा उपाध्या दिल्या असून, महाराष्ट्राच्या या समृद्ध लोककलेला देशाच्या आणि मोठ्या सांस्कृतिक व्यासपीठावर घेऊन जाण्याची मागणीही नेटकऱ्यांनी केली आहे.
