आजोबांची सायकल सवारी नाही, 'ही तर हवा हवाई'; भन्नाट Viral Video पाहून लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत | Loksatta

आजोबांची सायकल सवारी नाही, ‘ही तर हवा हवाई’; भन्नाट Viral Video पाहून लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत

रस्त्यावरून सायकल सवारी करताना आजोबांना हात सोडून पोज देण्याची भन्नाट कल्पना सूचली, अन्…

आजोबांची सायकल सवारी नाही, ‘ही तर हवा हवाई’; भन्नाट Viral Video पाहून लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत
भन्नाट Viral Video पाहून लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत (image-social media)

सोशल मीडियावर हिरोगीरी करण्यासाठी तरुणच असावं लागतं, असं नाही. कारण वृद्धापकाळातही भन्नाट स्टंट करुन नेटिझन्सची वाहवा मिळवण्यात काहींना कमालीचा रस असतो. रस्त्यावरू जाताना डान्स करणे, सापासोबत खेळ करणे, बाईकवरून जाताना स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे व्हायरल व्हिडीओ तुम्ही याआधी पाहिले असतील. पण सोशल मीडियावर एका आजोबांच्या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. सायकल चालवताना अनेकदा लोक हॅंडलचा वापर करून सवारीचा समतोल साधतात. पण एका वृद्धानं सायकल चालवताना कमालंच केलीय. सायकल जमिनीवर नाही तर आकाशातच चालत आहे, अशा अविर्भावात राहून आजोबांनी दोन्ही हात हवेत सोडले. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

रस्त्यावरून सायकल सवारी करताना आजोबांना हात सोडून पोज देण्याची भन्नाट कल्पना सूचली. सायकल रस्त्यावरू नाही तर आकाशात चालवत आहोत, असंच काहीसं आजोबांना वाटलं आणि त्यानंतर त्यांनी जे काही केलं ते पाहून तुम्ही लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत. हा संपूर्ण थरार रस्त्यावर असणाऱ्या एका व्यक्तीने कॅमेरात कैद केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोकांचं मनोरंजन होत आहे. आजोबांची या वयात असलेली एनर्जी, उत्साह आणि सायकल चालवण्याचा आनंद लुटण्याचा हावभाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नक्की वाचा – आक्रमक फलंदाजीच नाही, गोलंदाजीतही भेदक मारा, कोण आहेत भारताचे भविष्यातील अष्टपैलू खेळाडू? वाचा सविस्तर

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ ‘जिन्दगी गुलजार है’ नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ५३००० हून अधिक व्यूज मिळाले आहेत. ‘एन्जॉय एव्हरी मुमेंट’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सने कमेंट्सचा वर्षावही केला आहे. एका युजरने म्हटलं, ‘वय फक्त नंबर आहे’, हे या व्यक्तीनं सिद्ध करुन दाखवलं. तर दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं, ‘प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, उद्याची वाट पाहू नका.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 18:52 IST
Next Story
Video: लग्नाच्या वरातीत नाचताना ‘तो’ खाली कोसळला; बायको उचलायला गेली तर अवघ्या ५ सेकंदात…