Accident Hit And Run video:  काही दिवसांपासून देशभरात हिट ॲण्ड रनची प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. अशा घटनांवर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पण, यात सर्वसामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागतोय. अशाच प्रकारच्या हिट ॲण्ड रनच्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. देशभर गाजलेल्या पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणाची आता कानपूरमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. कानपूरमधील असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे, हा व्हिडीओ मन सुन्न करणारा आहे.

अल्पवयीन मुलाने अशी पळवली कार महिला जागीच ठार

Flight Attedent
Delta Airline : “योग्य अंतर्वस्त्रे परिधान करा”, फ्लाईट अटेंडंटना विमान कंपनीकडून तंबी!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
kalyan dombivli municipal corporation marathi news
कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस, मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष
Computer Engineer beat police marathi news
पुणे: मद्यधुंद संगणक अभियंत्याकडून पोलिसांना मारहाण, अभियंत्यासह भाऊ अटकेत
shani gochar 2024 saturn margi in kumbh these zodiac sign will be lucky
दिवाळीनंतर ‘या’ तीन राशीच्या लोकांना लक्ष्मी देणार धनाचा हंडा! शनी मार्गस्थ असल्याने नोकरी-व्यवसायात मिळणार यशच यश
Dates for each police station to record statement of victims in POCSO
पोक्सोंमधील पीडितांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना तारखा

अल्पवयीन असल्यानं गाडी चालवण्याचं लायसन्स मिळत नसलं तरी अशा मुलांचं गाडी चालवण्याचं प्रमाण वाढत आहे. या मुलांना टू-व्हीलर कशी चालवायची याचं प्रशिक्षण नसतं. बॅलन्स सांभाळता आला म्हणजे गाडी आली, असं समजलं जातं. वाहतुकीच्या नियमांची माहिती नसते, पण तरीही पालकांकडून त्यांना गाडी दिली जाते. मात्र, अशा पद्धतीने मुलांना गाडी चालवण्यास देणं पालकांसाठी खूपच महाग पडू शकतं. या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला असून, व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

अंगावर शहारे आणणारा अपघात

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गाडी इतक्या वेगाने आली की कुणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. कारने स्कूटरला इतकी जोरदार धडक दिली की, महिला आणि तिची मुलगी ३० फूट अंतरावर पडली. या अपघाताच्या वेळी कारचा वेग एवढा होता की, धडकल्यानंतर दुचाकीस्वार महिला काही फूट दूर उडून पडल्या. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, ज्या कारने त्यांना धडक दिली ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता, जो शाळा बंक करून परत आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: अचानक रस्ता खचला, पाईपलाईनही फुटली अन् खड्ड्यात पडून नगरसेवकासह ६ जण जखमी; भयानक दृश्य कॅमेरात कैद

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.  @gyanu999 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोकं वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.