The Great Khali with Smallest Women Viral Video: ‘द ग्रेट खली’ या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय रेसलर दलिपसिंग राणा याने WWE सोडून अनेक वर्ष झाली पण तरीही त्याची प्रसिद्धी काही कमी झालेली नाही. उंची आणि धिप्पाड देहयष्टी यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दलिपसिंग राणा उर्फ खलीने २०२२ च्या फेब्रुवारीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या वेळी खलीच्या रूपात अत्यंत बळकट जोड पंजाबमधील भाजपाच्या गटाला मिळाली होती. राजकीय प्रचार व रेसलिंग यापलीकडे सुद्धा खली आपल्या @thegreatkhali या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. अनेकदा त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात व त्यावर चाहते खूप मजेशीर कमेंट्स करतात.असाच एक व्हिडीओ अलीकडे खलीच्या अकाउंटवर शेअर केला गेला होता मात्र त्यावरून खलीला नेटकऱ्यांचा रोष पत्करावा लागत आहे.

खली या व्हिडीओमध्ये एकटा नसून त्याच्याबरोबर जगातील सर्वात कमी उंचीची महिला अशी ओळख असणारी ज्योती आमगे सुद्धा दिसून येत आहे. व्यायामशाळेत ज्याप्रमाणे एखादं डंबेल उचलावं त्याप्रमाणे खलीने एका हातात ज्योतीला उचलून धरलं आहे. खरंतर हा प्रकार त्या दोघांनीही मस्करीच्या दृष्टिकोनातूनच पाहिला असावा कारण फक्त खलीच नव्हे तर ज्योती सुद्धा व्हिडीओमध्ये हसताना दिसून येतेय. पण नेटकऱ्यांना मात्र हे भावलेलं नाही. अनेकांनी कमेंट मधून खलीवर टीका केली आहे. “ज्योती या उंचीने लहान असल्या तरी त्यांचे वय कमी नाही. एका प्रौढ (Adult) स्त्रीला अशा चुकीच्या पद्धतीने पकडणे हे लाजिरवाणे आहे”, “कदाचित ती घाबरून काही बोलत नसावी पण अशी मस्करी करणे हे योग्य नाही” असे नेटकऱ्यांनी द ग्रेट खलीला सुनावले आहे.

Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
flesh eating bacteria in japan
जपानमध्ये मांस खाणार्‍या जिवाणूचा उद्रेक, ४८ तासांत माणसाचा मृत्यू; हे जीवाणू जगभरात थैमान घालणार?
Never Ignore These Changes In Your Mole On Skin Priyanka Chopra Brother in Law Kevin Jonas Skin Cancer
प्रियांका चोप्राच्या दिराला त्वचेचा कर्करोग; तीळ व चामखिळाच्या ‘या’ बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, पाहा लक्षणे
Growth rate forecast increased to 7 2 percent However there is no relief from the Reserve Bank of interest rate reduction
विकासदर अंदाज वाढून ७.२ टक्क्यांवर; रिझर्व्ह बँकेकडून मात्र व्याजदर कपातीचा दिलासा नाहीच!
Man touched a woman in a crowded DTC bus
गर्दीचा फायदा घेत बसमध्ये महिलेला नको त्या जागी स्पर्श; महिलेने इशारा दिल्यानंतरही त्याने…तरुणाचा संतापजनक VIDEO व्हायरल
INDIA bloc leaders meeting Mallikarjun kharge forcasts 295 for INDIA
एक्झिट पोल्सवर विश्वास नाही; आम्ही २९५ च्या पार जाऊ – इंडिया आघाडीचा दावा
Leopard Attack in Coinbatore
रात्रीच्या अंधारात दोन डोळे चमकले, बिबट्यानं थेट भिंतीवर झेप घेतली अन्…, Video व्हायरल!
30 year of non white government in South Africa
विश्लेषण : दक्षिण आफ्रिकेत बिगर-श्वेतवर्णीय सरकारची ३० वर्षे … काय बरोबर, काय चुकले?

दरम्यान, तब्बल १९ लाखाहून अधिक व्ह्यूज असलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स सुद्धा केल्या आहेत. काहींनी तर गमतीत या दोघांची जोडी सुद्धा जुळवली आहे. स्वतः ज्योती यांनी या व्हिडीओखाली कमेंट करून थँक यु असे लिहिले आहे.

जगातील सर्वात कमी उंचीची महिला, कोण आहेत ज्योती आमगे?

ज्योती किसनजी आमगे यांचा जन्म नागपूर येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्या सरासरी उंचीच्या होत्या. त्यानंतर तिला ॲकॉन्ड्रोप्लासिया नावाचा आजार झाला. ज्यामुळे एका विशिष्ट उंचीच्या पुढे तिची उंची वाढली नाही. ज्योती २००९ मध्ये जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आली, जेव्हा ती फ्युजी टिव्हीच्या एक कार्यक्रमात दिसली. त्यानंतर ती त्याच वर्षी मिका सिंगच्या एका गाण्यासाठी व्हिडिओमध्ये दिसली. तिने चॅनलचार डॉक्युमेंट्री बॉडीशॉकमध्ये ती दिसली. या शोमध्ये डॉक्टरांनी तिची उंची मोजली असता, ती फक्त ६१.९५ सेंटीमीटर म्हणजेच सुमारे दोन फूट उंचीची असल्याचे आढळून आले, ज्यामुळे तिला सर्वात लहान जगातील सर्वात लहान महिला म्हणून मान्यता मिळाली. उल्लेखनीय म्हणजे तिचे वजन फक्त पाच ते साडेपाच किलो होते.

हे ही वाचा<< २ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा

यापूर्वी, २०१८ मध्ये इजिप्तच्या गिझा शहरातील पिरॅमिड्ससमोर,आठ फूट आणि नऊ इंच उंच असलेल्या तुर्कीतील सुलतान कोसेन या जगातील सर्वात उंच पुरुषासह पोज करतानाचा तिचा फोटो व्हायरल झाला होता. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी इजिप्शियन टुरिझम प्रमोशन बोर्डाने या दोघांना इजिप्तमध्ये आमंत्रित केले होते.