राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक कायमच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असल्याचं दिसून येतं. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात तर एकमेकांवार टीका करण्यासाठी सोशल मीडियासारखं प्रभावी अस्त्र वापरलं जातं. याच सोशल मीडियाचा वापर करुन काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एका व्हिडीओ ट्वीट केला आहे. काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार या व्हिडीओत शाह यांनी त्यांचे पुत्र आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना कॅमेऱ्यासमोरच ओरडल्याचं दिसत आहे.

नक्की वाचा >> Supriya Sule vs Shinde : “सुप्रिया सुळेंची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना…”; शिंदे गटाचं प्रत्युत्तर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन अमित शाह आणि जय शाह यांचा हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अवघ्या १२ सेकंदांचा आहे. व्हिडीओमध्ये पुरोहित मंत्रोच्चार करताना ऐकू येत आहे. अमित शाह हात जोडून उभे असल्याचं दिसत आहे. त्यांच्या बाजूला उभे असणारे जय शाह इकडे तिकडे पाहताना दिसत आहेत. अचानक अमित शाह जय शाह यांना हात लावून लक्ष दे असं सांगताना दिसतात. ‘आमा ध्यान दे’ असं गुजरातीमध्ये अमित शाह जय शाह यांच्याकडे रागात पाहून सांगताना व्हिडीओत दिसत आहे. जरा इकडे लक्ष दे असं अमित शाह जय शाह यांना पूजा सुरु असताना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

नक्की वाचा >> “एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर…”; दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण ऐकणार? विचारल्यावर अजित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर

हा व्हिडीओ शेअर करताना उत्तर प्रदेश काँग्रेसने, “अमित शाह त्यांचे पुत्र जय शाह यांना ‘पूजेकडे लक्ष दे’ असं सांगत आहेत,” अशी कॅप्शन दिली आहे. पुढे काँग्रेसने जय शाह यांनी टोमणा मारला आहे. “कादचित जय शाह यांना ठाऊक नसेल की कॅमेरा सुरु आहे,” असंही काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. “खरोखर त्यांना सनातन संस्कारांचा ओळख करुन दिली असती तर कॅमेराचा विचार करुन हे सारं करण्याची गरज पडली नसती,” असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये फोनवरुन बाचाबाची?

नक्की वाचा >> ‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “बारामतीत…”

हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे. कोणी शूट केला आहे यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister amit shah slam son jay shah to focus on puja congress tweets video scsg
First published on: 30-09-2022 at 18:43 IST