एका बेघर मुलाला मिठी मारणाऱ्या चिमुकल्याने लोकांची मनं जिंकली; हा भावुक VIDEO VIRAL

या व्हिडीओमध्ये दिसणार्‍या निरागस मुलानं असं काम केलंय जे पाहून सगळेच खूश होतील. याच कारणामुळे या व्हिडीओला सोशल मीडियावरील लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.

homeless-child-gives-warm-hug
(Photo: Instagram/ kiansh_ayansh)

जगातील प्रत्येक व्यक्तीला लहान मुलांच्या गोंडस गोष्टी आवडतात. अनेकदा लहान मुलं मोठ्यांपेक्षा जास्त हुशारीचं काम करून प्रसिद्धीझोतात येतात. सध्या सोशल मीडियावर दोन लहान मुलांचा एक गोंडस व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणार्‍या निरागस मुलानं असं काम केलंय जे पाहून सगळेच खूश होतील. याच कारणामुळे या व्हिडीओला सोशल मीडियावरील लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं एकमेकांसमोर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील एक मुलगा अचानक नाचू लागतो. त्याचवेळी, दुसरा मुलगा डान्स करत असलेल्या मुलाकडे येतो आणि त्याला मिठी मारतो. त्यानंतर समोरच्या मुलानेही त्याला घट्ट मिठी मारलेली दिसून येतेय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वचजणांना दोन्ही मुलांच्या निरागसतेचं वेड लागलंय.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनीही त्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. व्हिडीओ पाहिल्यानंतर, एका युजरने लिहिले की खरोखर बालपण ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने सांगितले की, दोन्ही मुलांनी त्यांच्या स्टाईलने लोकांची मने जिंकली. याशिवाय अनेक लोकांनी व्हिडीओवर अनेक प्रेमळ कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओखाली कमेंट्स सेक्शन वाचून लोकांना हा व्हिडीओ किती आवडला आहे, याचा अंदाज येतोय.

आणखी वाचा : VIRAL : गर्लफ्रेंडला किस करण्याच्या नादात पोलिसाने गमावली नोकरी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

आणखी वाचा : आकाशातून पडला चक्क भलामोठा साप…; आरडा ओरड करत सैरावैरा पळू लागले लोक, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ २८ ऑक्टोबर रोजी kiansh_ayansh नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, जो आता सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ११ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ जबरदस्त शेअर केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Homeless child gives warm hug to little boy in heartwarming viral video watch prp

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या