पैसा हा आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे पण प्रामणिकपणा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही . कारण पैशांशिवाय आपल्या अन्न, वस्त्र, निवारा मुलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही. कुटुंबाला सांभाळताना त्यांच्या गरजा भागवताना कितीही पैसे कामावले तरीही कमी पडतात, अनेकदा घरात अचानक आलेले आजारपण, संकटामुळे जवळ असलेले पैसा संपवून जातो. अनेकदा लोक पैसा कमावण्यासाठी आपला प्रामाणिकपणा सोडून वाईट मार्ग स्वीकारतात. पैसा जसा येतो तसा निघूनही जातो. त्यामुळे प्रामाणिकपणा सोडून मिळवलेले पैसा कायम टिकत नाही. गैरमार्गाने कमावलेला पैसा कधीही मनाला शांती मिळू देत नाही. देशात भ्रष्टाचार खूप वाढला आहे, फसवणूक खूप वाढले आहे, प्रामाणिकपणे जगणार्‍यांचा हा काळ राहिला नाही असे म्हणतात. पण जगात अजूनही चांगली आणि प्रमाणिक लोक आहेत म्हणून अजूनही या जगात माणुसकी टिकून आहे. प्रामाणिकपणा जपणारे फार कमी लोक असतात जे कितीही संकट आलं प्रामाणिकपणा कधीही सोडत नाही. काहीही परिस्थिती समोर आली तरी हार मानत नाही, कष्ट करतात, त्रास सहन करतात पण खोटं कधीही वागत नाही. सध्या अशा काही प्रमाणिक व्यक्तींची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – कसा येतो भयावह पूर? काळजात धडकी भरवणारा ३५ सेंकदाचा Video Viral

kalyan ganeshotsav 2024
कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान, जलप्रदूषण रोखण्यासाठी कडोंमपाचा उपक्रम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
ग्रंथसंपदेचे राखणदार: आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
Kaustubh Pandharipande faces a big challenge of kidney disease
नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
स्वच्छता कर्माचाऱ्यांनी परत केली हरवलेली बॅग ( सौजन्य – super__nanded
)

सोशल मीडियावर अशाच एका प्रामाणिक कर्मचार्‍यांचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही स्वच्छता कर्मचारी महिला रस्ता साफ करत आहे. तेवढ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवरील बॅग खाली रस्त्यावर पडते. बॅग पडताच स्वच्छता कर्मचारी महिला ती बॅग उचलतात आणि गाडीवरून जाणाऱ्या व्यक्तीला लगेच आवाज देतात आणि बॅग परत करतात. स्वच्छता कर्मचार्‍यांचा हा प्रामाणिकपणा पाहून त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आपली एखादी वस्तू हरवली तर किती वाईट वाटते पण तीच हरवलेली वस्तू कोणी परत केली तर किती आनंद होतो हे शब्दात सांगता येणार नाही. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी स्वच्छता कर्मचार्‍यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

हेही वाचा – “आजीला मानलं पाहिजे राव!” वय झालं तरी रोज सायकल चालवत कामाला जातात आजीबाई, Viral Video एकदा बघाच

व्हिडिओ super__nanded नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आयुष्यात कष्टाने कमावणे म्हणजे स्वाभिमानाने जगणे!तसेच व्हिडीओवर दिसणार्‍या मजकूरामध्ये लिहिले आहे की,”आयुष्यात कमी कमावलं तरी चालेल पण ते कष्टानं कमावलेलं असावं”

हा व्हिडिओ प्रामाणिकपणाचे महत्त्व पट‍वून देतोच पण कष्ट करून कमावणे का महत्त्वाचे आहे तेही सांगत आहे.