scorecardresearch

भरधाव रुग्णवाहिकेला ओव्हरटेक करताना बाईकस्वाराचा भयंकर अपघात, Video पाहून थरकाप उडेल

भरधाव वेगामुळे किती भयंकर संकटाचा सामना करावा लागू शकतो याचं एक उदाहरण समोर आलं आहे.

Viral Video of bike accident
सोशल मीडियावर हजारो अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. (Photo : Instagram)

सोशल मीडियावर हजारो अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, तरीदेखील लोक या अपघातांमधून काही शिकत नाहीत याचं प्रत्येय दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघाताच्या संख्येवरुन आपणाला येतो. देशभरात केवळ रस्त्यावरील अपघातामुळे मृत्यू होणाऱ्याची संख्या काही लाखांमध्ये आहे. यातील बहुतांश अपघात हे वाहन भरधाव वेगाने चालवण्यामुळे होतात. प्रचंड वेगाने धावणारी वाहने बाजारात रोज येत आहेत. ज्यावर स्वार होऊन तरुणवर्ग जणू हवेशी स्पर्धा करताना दिसतो. मात्र, या भरधाव वेगामुळे किती भयंकर संकटाचा सामना करावा लागू शकतो याचं एक उदाहरण समोर आलं आहे, जे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

अलीकडच्या काळात भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. भरधाव वेगाने बाईक चालवणाऱ्यांना त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि अपघात होतात. अशा परिस्थितीत होणारे अपघातही अत्यंत धोकादायक असतात. सध्या अशाच एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भरधाव वेगाने बाईक चालवणारा तरुण अपघाताला बळी पडल्याचं दिसतं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण बाईक चालवताना काळजी घेतील हीच अपेक्षा.

हेही पाहा – “चोर नव्हे चींधीचोर…” तरुणांनी चोरी केलेल्या घटनेचं CCTV फुटेज पाहिल्यानंतर पोट धरुन हसाल

भरधाव वेगामुळे झाला अपघात –

denealro1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार हायवेवरुन जाताना दिसत आहे. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून एक व्यक्ती सुसाट वेगाने बाईक चालवत येतो, त्याच्या समोर असणाऱ्या एका रुग्णवाहिकेला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो रस्त्यानवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला जोराची धडक देतो, त्यामुळे पायी जाणारी व्यक्ती रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याचं दिसत आहे. तर पुढे जाऊन दुचाकीस्वारही अपघातात गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- लहान भावाच्या वाढदिवसानिमित्त त्याने भाकरीवर लावली मेणबत्ती, भावनिक Video पाहूण डोळ्यात येईल पाणी

रस्त्यावरील व्यक्तीला धडकल्यानंतर दुचाकीस्वाराचा तोल सुटला आणि तो जोरात फरपटत जातो. जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहून युजर्स फुल स्पीडने दुचाकी चालवणं टाळा, असं आवाहन करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 11:34 IST