Viral Video : कुत्रा हा माणसाच्या अत्यंत जवळचा प्राणी समजला जातो. कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर बघतो. माणसाच्या सानिध्यात राहून काही कुत्रे सुद्धा माणसांप्रमाणे वागताना दिसतात पण अनेकदा मानवी वस्तीत वावरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
हल्ली मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट खूप वाढला आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे ही एक चिंतेची बाब ठरत आहे. अशात मोकाट कुत्र्यांचे हल्ले सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. (Horrible video A Street Dog attack on a Young girl on Road in Bareilly Uttar pradesh)

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कुत्र्यांच्या हल्ल्यात काही लोकांना जीव गमवावा लागतो तर काही लोक गंभीर जखमी होतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा मुलीवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

हेही वाचा : Reelsचा नादात काय काय करतात! महिलेचा जुगाड पाहून डोकं धराल, व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे खूप भयानक दिसतेय. उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका मोकाट कुत्र्याने एका लहान मुलीवर हल्ला केला”

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल दोन मुली रस्त्याने जात होत्या. अचानक मागून एक कुत्रा येतो आणि त्या मुलींजवळ उभा राहतो. एक मुलगी स्वत:ला वाचवत पुढे जाते तर दुसरी भीत तिथेच उभी राहते. तेव्हा कुत्रा त्या मुलीवर हल्ला करतो. कुत्रा इतक्या जोराने हल्ला करतो की मुलगी खाली पडते तेव्हा तिच्याबरोबर असलेली मुलगी जोराने ओरडते. हे ऐकून थोड्या अंतरावर उभी असलेली तेव्हा दोन माणसे धावत येतात आणि तिला कुत्र्यापासून वाचवतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ओला ड्रायव्हरची नवी शक्कल, बनावट स्क्रीनशॉट दाखवत तरुणीला फसवण्याचा केला प्रयत्न; वाचा नेमकं घडलं काय?

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद. लोक धावत आले आणि तिला वाचवले” तर एका युजरने लिहिलेय, “मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.आपण ती थांबवली पाहिजे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “सगळीकडे गावात, शहरात अशीच परिस्थिती आहे”