Road Accident Viral Video : रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या असे वारंवार सांगितले जाते. पण अनेकदा काळजी घेऊनही घडायचे ते अपघात घडतातच, यात नाहक निष्पाप लोकांना आपले प्राण गमावावे लागतात. या अपघातामागे कारणं अनेकदा वेगवेगळी असतात पण त्याची भीषणता अधिक असते. सध्या अशाच एका अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
अपघाताचा हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण व्हिडीओमध्ये अपघातानंतर फुटलेल्या गाड्या रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दिसत आहेत. ज्यात तीन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एका गाडीला मागच्या बाजूने तर दुसऱ्या गाडीचे समोरच्या बाजूने नुकसान झाल्याचे दिसतेय. यातील धक्कादायक दृश्य म्हणजे तिसरी गाडी थेट पुढच्या गाडीच्यावर पूर्णपणे वर पलटी झाली आहे. यावरुन कल्पना करा की अपघात किती भीषण झाला असेल. हा अपघात कसा घडला किंवा त्यात कोणाचा मृत्यू झाला का, हे अस्पष्ट आहे, पण हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अपघाताचा हा भयानक व्हिडीओ @vijeshetty नावाच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भारतातील रस्ते अपघात हा एक केस स्टडी आहे. अपघाताचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझरने लिहिले- अशिक्षित आणि बेजबाबदार लोकांना सहज लायसन्स मिळतात, आता तुम्ही काय अपेक्षा करता. दुसऱ्या युझरने लिहिले- फास्ट अँड फ्युरियसचे इंडियन वर्जन. तिसऱ्या युझरने लिहिले- कल्पना करा की अपघात किती भीषण झाला असेल. आणखी एका युझरने लिहिले- हे रोहित शेट्टीच्या चित्रपटाच्या सेटसारखे दिसते.
