Premium

सुपारीचे फळ कसे असते? राप्याने सुपारी कशी सोलतात? पाहा व्हायरल व्हिडीओ

सुपारीचा वापर कसा केला जातो हे आपल्याला माहित आहे पण सुपारीचे फळ कसे असते आणि त्यातून सुपारी कशी बाहेर काढली जाते हे तुम्हाला माहित आहे का? माहित नसेल तर हा व्हिडीओ पाहा

| How is the fruit of betel nut how to peel betel nut see the viral video
राप्याने सुपारी कशी सोलतात ( फोटो सौजन्य – इंस्टाग्राम kokani_bayal_manus )

आपल्याकडे सुपारीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. पान सुपारी लोक आवडीने खातात. सुपारी तुरट आणि किंचित मधुर रसाची असते. श्री चरकसंहितेत सू. अ. ४ यातील ५० महाकषायामध्ये कृमीनाशक गणात सुपारीला अग्रस्थान आहे. कारण सुपारी शीतगुणाची आहे. मेघालय या हिमालयातील राज्यात शिलाँग या राजधानीत जवळपास ९० टक्के लोक दिवसभर कच्च्या सुपारीचे सेवन करत असतात. त्याच बरोबर धार्मिक कार्यांमध्येही सुपारीला फार महत्त्व आहे. ओटीपासून पुजेपर्यंत अनेक ठिकाणी सुपारीचा वापर होतो. लग्नातही सप्तपदीच्या वेळी ७ सुपाऱ्या वापरल्या जातात.

कोकणात दारोदरी सुपाऱ्या पिकल्या जातात. समुद्रकाठच्या प्रदेशात खूप मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या सुपारीस कोकणात पोफळ अथवा बेडे, पुगफल (संस्कृत), छालिया, सुपारी (हिंदी), सोपारी (गुजराती), पोपल (फारसी) अशा विविध नावांनी संबोधले जाते. सुपारीचा वापर कसा केला जातो हे आपल्याला माहित आहे पण सुपारीचे फळ कसे असते आणि त्यातून सुपारी कशी बाहेर काढली जाते हे तुम्हाला माहित आहे का? माहित नसेल तर हा व्हिडीओ पाहा ज्यामध्ये सुपारी कशी सोलावी हे दाखवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर kokani_bayal_manus नावाच्या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कोकणात राहणारी एक महिला त्यांच्या बागेतील सुपाऱ्या सोलताना दिसत आहे. कोकणी भाषेमध्ये ही महिला सुपारी कशी सोलायची हे दिसते. व्हिडीओमध्ये महिलेच्या एक प्रकारचा चाकू दिसत आहे. तो चाकू ती सुपारीच्या फळामध्ये घुसवते आहे आणि जोरात फळीवर आपटते. त्यानंतर वरील आवारण काढून आतली सुपारी बाहेर काढते.

हेही वाचा – “सॉफ्टवेअर जॉब सोडा आणि चांदणी चौकात लेहेंगा विका” तरुणाच्या पोस्टवरून सोशल मीडियावर पेटला नवा वाद

राप्याने सोलतात सुपारी

व्हिडीओमध्ये महिलेने असेही सांगितले की, “सुपारी सोलण्यासाठी जो चाकू वापरला जातो त्याला राप्या म्हणतात. हा चाकू बाजारात मिळत नाही तर बनवून घ्यावा लागतो. काही मोजके कारगिरच तो बनवू शकत्ता. राप्या हा एक चाकू आहे ज्याला मूठ असते आणि टोकदार आकार दिला जातो.”

हेही वाचा – GPay वापरून मोबाईल रिचार्ज करण्यासाठी मोजावे लागणार पैसे? कोणतेही शुल्क न भरता कसा करावा रिचार्ज, जाणून घ्या खास ट्रिक

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. अनेक लोक व्हिडीओवर कमेंट करून कौतूक करत आहे. एकाने लिहिले, “मस्त परिचय दिला सुपारी विषयी ताई” दुसरा म्हणाला “खूप छान आणि चांगली माहिती दिली ताई”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How is the fruit of betel nut how to peel betel nut see the viral video snk

First published on: 04-12-2023 at 22:42 IST
Next Story
अरे देवा! विचित्र पदार्थांमध्ये अजून एकाची भर… सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सफरचंद इडलीचा व्हिडीओ पाहिलात का?