Chanakya Niti: चाणक्य नीतीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देते. कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात अपयशी व्हायचे नसते. यश मिळवण्यासाठी व्यक्ती कठोर मेहनत करते. अनेक गोष्टींचा त्याग केल्यानंतरच व्यक्तीला यशाची चव चाखता येते. चाणक्यांनीही मान्य केले आहे की मेहनत आणि त्यागाशिवाय यशाची कल्पनाही करता येत नाही. यशाचा मार्ग खूप कठीण असतो. ज्याच्यामध्ये धैर्य आणि मेहनत करण्याची जिद्द असते, तोच या मार्गावर चालून आपले ध्येय गाठतो.
आचार्य चाणक्यांच्या मते, खरे यश तेच आहे ज्याचा फायदा समाजातील शेवटच्या व्यक्तीलाही जाणवतो. जेव्हा एखादी व्यक्ती ही गोष्ट लक्षात ठेवून आपले ध्येय गाठते, तेव्हा तिला प्रत्येक ठिकाणी मान-सन्मान मिळतो. अशा लोकांवर लक्ष्मी देवीची कृपाही राहते. आचार्य चाणक्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात या चार गोष्टी अंगीकारल्या, तर तिला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चला जाणून घेऊया त्याबद्दल
मेहनतीने कोणतेही ध्येय गाठता येते
चाणक्यांच्या मते, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्यक्तीने कधीही मेहनतीपासून दूर पळू नये. एखादी व्यक्ती जितकी जास्त मेहनत करते, तितकी तिच्या यशाची शक्यता वाढते. आचार्य चाणक्य मेहनतीचे महत्त्व सांगताना म्हणतात की, जी व्यक्ती मेहनत करते, तिच्याजवळ गरिबी आणि दरिद्रता कधीही येत नाही.
अध्यात्माची शक्ती ओळखा
चाणक्यांच्या मते, धर्म आणि अध्यात्म व्यक्तीला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून देतात. प्रत्येक व्यक्तीच्या काही खास जबाबदाऱ्या असतात आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अध्यात्माच्या शक्तीमुळे व्यक्तीचे मन स्वच्छ राहते. अशा व्यक्ती चुकीची आणि अनैतिक कामे करण्यापासून दूर राहतात.
मौनाची शक्ती ओळखा
चाणक्यांच्या मते, भांडण आणि वाद व्यक्तीचे नुकसान करतात. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे. यापासून वाचण्यासाठी मौनाचा मार्ग स्वीकारावा. शांत राहिल्याने वाद आणि भांडणे टाळता येऊ शकतात.
सतर्क आणि सावध राहा
चाणक्यांच्या मते, व्यक्तीने नेहमी सतर्क आणि सावध राहिले पाहिजे. ज्या व्यक्ती या गोष्टी लक्षात ठेवतात, त्या संकट आले तरी घाबरत नाहीत. आयुष्यातील भीती दूर केली पाहिजे. यासाठी व्यक्तीने नेहमी सतर्क राहिले पाहिजे आणि जागरूक अवस्थेत राहिले पाहिजे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
