How to Become Rich: वेळ चांगली असेल तर चूकही मजाक वाटते आणि वेळ खराब असेल तर मजाकही चूक ठरते. त्यामुळे आपल्या आनंदाच्या गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवा. आजकाल लोकांची नजर खूप लवकर लागते.

जगाची खरी वस्तुस्थिती अशी आहे की, खऱ्या माणसाला नेहमी खोट्या माणसापेक्षा जास्त स्पष्टीकरण द्यावं लागतं. माणूस बहुतेक वेळा दोन ठिकाणी हारतो – एक आपल्या कुटुंबासमोर आणि दुसरं आपल्या प्रेमासमोर. जो व्यक्ती तुमच्याशी बोलणं बंद करतो, तोच नंतर इतरांसमोर तुमच्याबद्दल बोलत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जितकं जास्त एखाद्याला महत्त्व द्याल, तितकी तुमची स्वतःची किंमत कमी होत जाते.

श्रीमंत होण्याचं खरं सत्य

प्रत्येकाचं श्रीमंत होण्याचं स्वप्न असतं, पण सत्य हे आहे की फक्त रात्रंदिवस मेहनत केल्याने कोणी श्रीमंत होत नाही. श्रीमंत तोच होतो जो योग्य नीती पाळतो. आचार्य चाणक्यांनी हजारो वर्षांपूर्वीच सांगितलं होतं की, मेहनतीने घाम येतो पण नीतीने संपत्ती तयार होते.

आजचं जग तुम्हाला सांगेल की, ‘पळा, मेहनत करा, इतरांपेक्षा पुढे निघा.’ पण खरी गोष्ट अशी आहे की जो व्यक्ती गर्दीपेक्षा वेगळा विचार करतो, तोच खरं यश आणि पैसा मिळवतो. तर अशाच चाणक्य नीतीतून जाणून घेऊया की श्रीमंत कसं होता येतं.

चाणक्यांच्या ५ शक्तिशाली नीती

ज्ञान मोफत वाटू नका

ज्ञान हे सर्वात मोठं धन असतं, ते जपून ठेवायला हवं. जर तुम्ही ते सतत मोफत देत राहिलात, तर लोक त्याची किंमत करत नाहीत. तुमच्याकडे बोलण्याची, शिकवण्याची, लिहिण्याची किंवा अनुभवाची कला असेल, तर त्याचं प्रोडक्ट बनवा, कोर्स तयार करा आणि त्याची किंमत समजा.

आधी विचारांनी श्रीमंत बना

गरीब विचारसरणीचा माणूस कितीही कमावला तरी स्वतःला गरीबच समजतो. श्रीमंत तोच बनतो जो विचार करतो की, ‘मी करू शकतो.’ विचार बदलले की आयुष्यही बदलायला लागतं.

पैशाच्या मागे धावू नका, गरज समजा

पैसा नेहमी तिथे जातो जिथे समस्येचं समाधान मिळतं. जर तुम्ही लोकांची गरज समजून काम केलं, तर पैसा स्वतःहून तुमच्याकडे येईल.

बाहेरून साधे, आतून हुशार बना

आपली खरी ताकद कधीही दाखवू नका. लोक तुम्हाला कमजोर समजतात, तेव्हाच तुम्ही त्यांना सहज हरवू शकता. लपलेली हुशारी हीच सर्वात मोठी ताकद असते.

पैसा आणि योजना गुप्त ठेवा

आपली कमाई आणि खर्च याचं प्रदर्शन करू नका. दिखावा केल्याने लोक स्वार्थासाठी जवळ येतात आणि नुकसान करतात. खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे शांतपणे पैसा वाढवत राहणं.

बोनस नीती

चाणक्यांच्या मते, जर खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर आराम सोडावा लागतो. जो माणूस फक्त सुख शोधतो, तो कधीच मोठा होत नाही. यशस्वी तोच होतो जो अडचणी स्वीकारतो आणि शिस्तीने काम करतो.

शेवटची गोष्ट

आजपासून स्वतःला प्रश्न विचारा की, ‘मला काय बनायचं आहे आणि मी काय करत आहे?’ आपलं ध्येय लिहा, छोटे-छोटे पाऊल उचला आणि सतत स्वतःवर काम करा. कारण लक्षात ठेवा, पैसा असेल तर जग सोबत असतं आणि पैसा नसेल तर आपलेही साथ सोडतात.

(टीप- या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)