Online Fraud : गेल्या काही काळात सोशल मीडियाचा वापर कमालीचा वाढला आहे. या माध्यमामुळे अनेकांना रोजगार मिळालाय, प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय अनेक चांगल्या गोष्टी जगासमोर आणण्यासाठी प्लॅटफॉर्म्स मिळाले आहेत. पण चांगल्या गोष्टींसोबतच सायबर क्राईमच्या घटना देखील कमालीच्या वाढल्या आहेत. डिजीटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. कित्येक लोकांना आपण ऑनलाईन फसवणुकीचे शिकार झालो आहोत हेसुद्धा समजत नाही. जेव्हा त्यांना समजतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मात्र इथे तरुणानं स्कॅमरला असं जाळ्यात पकडलं की व्हॉट्सअॅप चॅट वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल. डेटिंग अॅपवर तरुणीला असा शिकवला धडा हल्ली तर डेटिंग अॅपवरही मोठ्या प्रमाणात फसवणुक पाहायला मिळते. बरं यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुलेही बळी पडतात. पण एका तरुणानं अशी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या तरुणीला असा धडा शिकवला की यापुढे ही तरुणी कोणत्या मुलाशी पंगा घेण्याची हिंमतच करणार नाही. डेटिंग ॲपवर मुलीच्या नावानं चॅट करत होता लोकांना अगदी हातोहात फसवलं जातंय. पैशांचं आमिष दाखवून त्यांचं बँक खाती रिकामी केली जातायेत. पण जर तुम्ही थोडी सावधानता बाळगलीत तर उलट तुम्ही या स्कॅमर्सला ट्रोल करू शकता. अन् याचिच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. पाहा एका तरुणानं ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका तरुणीला धडा शिकवलाय. या तरुणानं त्या तरुणीसोबत केलेली चॅटिंग पाहून खरंच तुम्ही सुद्धा शॉकच व्हाल. मात्र ही मुलगी नसून हो एक स्कॅमर मुलीच्या नावानं बोलत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे डेटिंग ॲपवर मुलीच्या नावानं चॅट करणाऱ्या स्कॅमरला चांगलीच अद्दल घडली आहे. नक्की काय घडलं? तर झालं असं की जय नावाच्या तरुणाची यामी नावाच्या मुलीसोबत ऑनलाईन मैत्री झाली आणि ते बोलायला लागले. ते वरचे वर बोलत असताना एकदा या मुलीनं जयकडे १ हजार रुपये मागितले. ती म्हणाली "मला आता अर्जंट पैसे हवे आहेत, काही तासांत ती परत करेल" असं आश्वासन तिनं दिलं. पण हा तरुण स्मार्ट निघाला. त्याला शंका आली आणि त्यानं हाच स्कॅम तिच्यावर उलटा फिरवला. त्यानं सांगितलं की "माझ्या अॅपचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तू जरा मला २० रुपये पाठवतेस का म्हणजे मला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळेल." तेव्हा ही तरुणी २० रुपये त्याला पाठवते आणि हा तरुण त्या २० रुपयाची सिगारेट विकत घेतो. आणि नंतर तिला फोटो पाठवतो, म्हणजेच त्यानं तिच्याबरोबरच स्कॅम केला. पाहा चॅटिंगचे स्क्रीनशॉट हेही वाचा >> “हा आनंद जगात नाही” शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसानं मारली मिठी; पहिल्या पावसानंतरचा VIDEO एकदा पाहाच हे चॅटिंगचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर @enoughjayy नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हायरल होत आहेत. तर नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.