E Challan viral video: भारतात ड्रायव्हिंगचे नियम अतिशय कडक आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नियम मोडल्यावर भरावी लागणारी दंडाची रक्कमही पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. तरीही काहीजण वाहतुकीचे नियम मोडतात. तुम्हीही हेल्मेट न घालता गाडी चालवता का? किंवा वाहुतकीचे नियम मोडता का? तसं असेल तर सावध व्हा. नव्या मोटर वाहन कायद्यानुसार वाहतूक नियम मोडल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत जवळपास दहापट वाढ झाली आहे. त्यानंतर अनेकजण सतर्क झाले आहेत. विशेष म्हणजे आता ई-चलन सुरू झाल्याने आपण गडबडीत वाहतूक नियम मोडत निघून गेलो तरी आता आपल्या नावावर ई-चलन तयार होते आणि दंडाची नोंद होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये पोलिस एकाचवेळी अनेकाचं इ-चलान कशाप्रकारे कापतात हे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून वाहतुकीचे नियम तोडताना तुम्हीही १०० वेळा विचार कराल.

ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुमचे ई-चलन कापले जाते. मात्र अनेक वेळा वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर लोकांना आपले ई-चलन निघाल्याचेही कळत नाही. जेव्हा ई-चलन भरण्याचा मेसेज येतो, तेव्हा लोकांना त्याची माहिती मिळते.त्यामुळे अनेक चालकांना आपल्या नावावर काही दंड तर जमा नाही ना असा प्रश्न सतावत असतो.रस्त्याने वाहन चालवताना नियमांचं पालन करावं लागतं. नियमांचे पालन केलं नाही तर वाहतूक पोलीस चलन फाडतात. आजकाल बऱ्याच शहरांमध्ये रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, त्यामुळे कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं की तुमचं चलन कापलं जातं आणि ऑनलाईन मेसेज करून पाठवलं जातं.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कोण बरं करत असेल? तर या व्हायरल व्हिडीओतून याचं उत्तर मिळालं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रुममध्ये भींतीवर १५ ते २० टिव्ही लावण्यात आल्या आहेत. यावर शहरातल्या वेगवेगळ्या भागातील रस्ते, सिग्नल दिसत आहे. यावेळी पोलीस या रस्त्यावर जे चालक नियम मोडत आहेत त्यांना टिव्हीवर होल्ड करून त्यांच्या गाडीचा नंबर नोट करुन त्यांचं चलान कापत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. त्यामुळे आता वाहतूकीचे नियम मोडताना नक्की विचार करा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! शेतात एकटा तरुण बिबट्याशी भिडला; तरुणाची ट्रिक पाहून व्हाल अवाक्

हा व्हिडीओ cop_saumya_si नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.