Viral Video : भाऊ बहिणीचे नाते हे जगावेगळे आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. बहीण भाऊ एकमेकांबरोबर भांडतात पण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. बहीण सुद्धा हक्काने भावाला गिफ्ट किंवा पैसे मागते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रक्षाबंधनला भावाला पैसे कसे मागावे, याविषयी सांगताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला रक्षाबंधनला भावाला पैसे कसे मागावे, याविषयी सांगते. व्हिडीओमध्ये महिला फोनवर भावाबरोबर बोलताना दिसत आहे. त्यांचा संवाद खालीलप्रमाणे - महिला - काय करतोस रेभाऊ - कामाचं बोला मॅडममहिला - रक्षाबंधन जवळ येतेय, किती पैसे देणार तू मला?भाऊ - एक हजारमहिला - एक हजार नको यार २ हजार तरी दे. यावेळी जरा दानशूर बन. तुला माहितीय ना आपले आजोबा काय म्हणायचे, बहिणीला दिलं की भावांची भरभराट होते. दोन हजार देशील यावेळेस नक्की.भाऊ - बरं बाई देतोमहिला - पाठव ना ग आताच.. फोन पे लाभाऊ - अगं त्या दिवशीच देतो नामहिला - त्या दिवशी नको, मला आता पाहिजे. मला छान साडी घ्यायची आहे.भाऊ - त्या दिवशी आल्यावर काय कर १०० रुपये ताटात ठेव.महिला - तुझी बायको ही खूश आणि मी ही खूशभाऊ - बर बाई पाठवतो. अजून काय?महिला - काही नाय, काही नाय पाठव लगेच. बाय बाय. या व्हिडीओवर लिहिलेय, "रक्षाबंधनला भावाला पैसे कसे मागावे?" हेही वाचा : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ढाकामध्ये भव्य रॅली? हजारो लोक रस्त्यावर; पण VIDEO नेमका कधीचा? वाचा सत्य पाहा व्हायरल व्हिडीओ karishma_dheeraj3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "रक्षाबंधनला गिफ्ट कसे मागवायचे?"या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "ताई तुम्हाला माझ्याकडून १ डझन साड्या पण तुम्ही रील बनवायच्या थांबू नका." तर एका युजरने लिहिलेय, "साडी नेसून राखी कशी बांधायची?" आणखी एका युजरने लिहिलेय, "यावेळी रक्षाबंधन ऑनलाईन पद्धतीने चालु झालीय अस वाटतय" एक युजर लिहितो, "आता अजून साड्या घेणार तुम्ही.. अजून व्हिडिओ बनणार"