Chanakya Niti: चांगले आणि सुखी जीवन जगण्यासाठी आचार्य चाणक्यांनी त्यांच्या ‘नीती शास्त्र’ या ग्रंथात अनेक प्रकारच्या नीती सांगितल्या आहेत. त्यांच्या नीती माणसाला जीवन जगण्याची योग्य पद्धत शिकवतात. एका श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी माणसाने कोणत्या सवयी सोडल्या पाहिजेत, हे सांगितले आहे. चला, जाणून घेऊया त्या ६ सवयींबद्दल…

कुचैलिनं दन्तमलोपधारिणं बह्वाशिनं निष्ठुरभाषिणं च।
सूर्योदये चास्तमिते शयानं विमुञ्चतिश्रीर्यदि चक्रपाणि:।।

अस्वच्छ कपडे

माणसाने नेहमी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. अस्वच्छ कपडे घालणाऱ्या व्यक्तीजवळ लक्ष्मी कधीही येत नाही, असे चाणक्य सांगतात. अशा लोकांना अनेक ठिकाणी अपमान आणि तिरस्कार सहन करावा लागतो.

अस्वच्छ दात

दात घाण ठेवणाऱ्या व्यक्तीजवळही लक्ष्मीचा वास नसतो. अशा व्यक्तीला गरिबीचा सामना करावा लागू शकतो. याउलट, दातांची नियमित स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा राहते.

गरजेपेक्षा जास्त खाणे

गरजेपेक्षा जास्त खाणारी व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. अशी व्यक्ती हळूहळू गरिबीच्या दलदलीत अडकत जाते.

कडू आणि कठोर शब्द बोलणारी व्यक्ती

कडू आणि कठोर शब्द बोलणारी व्यक्तीही श्रीमंत होऊ शकत नाही. चाणक्यांच्या मते, आपल्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही किंवा ती व्यक्ती दुखावली जाणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.

जास्त वेळ झोपणे

जास्त वेळ झोपणाऱ्या व्यक्तीजवळही लक्ष्मी येत नाही. अशी व्यक्तीही कधी श्रीमंत होऊ शकत नाही. कोणतेही कारण नसताना जास्त झोपणे हानिकारक ठरू शकते.

फसवणूक आणि बेईमानी

फसवणूक आणि बेईमानी करून पैसे कमावणारे लोक जास्त काळ श्रीमंत राहत नाहीत. असे लोक लवकरच आपला पैसा गमावून बसतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)