Viral video: बनावट दारू प्यायल्याने रोज कित्येक लोकांचा मृत्यू होतोय, त्याच्या बातम्या आपण रोज कुठे ना कुठे वाचतो किंवा ऐकतो. बनावट दारुमुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. मग ओरिजिनल दारू कोणती आणि बनावट दारू कोणती हे कसं ओळखावं असा प्रश्न अनेकांना पडतोय. बनावट दारू आणि खऱ्या दारूमधला फरक कसा तरी लोकांना कळला तर त्यांचा जीवही वाचू शकतो आणि नकली दारूचा व्यापार करणाऱ्यांचाही पर्दाफाश होऊ शकतो. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे ज्यामध्ये कशाप्रकारे बनावट दारु बनवली जाते आणि विकली जाते हे समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती खोटी दारूचं पॅकिंग कसं केलं जातं हे स्वत: करून दाखवत आहे. सर्वात आधी त्याने एका महागड्या दारूची बॉटल घेतली. दारू संपल्यानंतर ही बॉटल भंगारमध्ये फेकण्यात आली होती. मग त्यानं या ड्रील मशिनच्या मदतीनं या बॉटलचं झाकण तोडलं आणि मग त्यामध्ये डुप्लीकेट दारू भरून पुन्हा एकदा पहिल्यासारखी पॅकिंग केली. अशा प्रकारे डुप्लीकेट दारू महागड्या बाटल्यांमध्ये भरून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.

दारू खरेदी करताना काय काळजी घ्याल?

बनावट दारू बनवणारे इतके हायटेक झाले आहेत की ते बनावट दारूचा रंग, चव आणि वास अशा प्रकारे तयार करतात की जणू ती खरी दारू आहे. मात्र असे असतानाही थोडी काळजी घेतल्यास बनावट दारू ओळखता येते. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही दारू खरेदी कराल तेव्हा अधिकृत दुकानातूनच खरेदी करा. अधिकृत दुकानातून दारू विकत घेतल्यास बनावट दारू मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. यासोबतच तुम्ही बनावट दारू त्याच्या पॅकेजिंगवरूनही ओळखू शकता. तुम्हाला दिसेल की बनावट दारूचे पॅकेजिंग खूपच खराब असेल आणि त्याच्या नावाचे स्पेलिंग देखील गोंधळात टाकणारे असेल. यासोबतच बनावट दारूच्या बाटल्यांचे सीलही अनेकदा तुटले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लेक ऑफिसर झाली पण बघायला वडील नाहीत; आठवणीत धायमोकलून रडली, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

तुम्ही बनावट दारू प्यायल्यास काय होईल?

जर तुम्ही चुकून बनावट दारू प्यायलात तर तुमच्या शरीरात अनेक बदल दिसून येतील, त्याचा तुम्हाला त्रास होतो. उलट्या होणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेण्यात अडचण, हायपोथर्मिया आणि गुंगी येणे किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसतील. ही लक्षणे जर एखाद्या दारू प्यायलेल्या व्यक्तीमध्ये दिसत असतील तर त्याने बनावट दारू सेवन केल्याचं स्पष्ट होतंय. पण कधी कधी त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.