Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर सध्या एक खेळ चांगलाच व्हायरल होत आहे. जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही खेळाचा एक तरी व्हिडीओ नक्की बघितला असेल ज्यामध्ये काही मित्र एकत्र येऊन हा खेळ खेळतात. या खेळाचे नाव आहे ‘एक मछली… पानी में गई… छपाक’, सोशल मीडियावर हा खास खेळ लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्व जण खेळताना दिसत आहे. तुम्हाला माहिती आहे का, हा खेळ कसा खेळतात? आज आपण या खेळाविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

हा खेळ कसा खेळतात?

हा खेळ खेळताना तुमच्याजवळ चार पाच मित्रांचा एक ग्रुप असावा. या खेळामध्ये ‘एक मछली… पानी में गई… छपाक’ या वाक्याचा वापर करायचा आहे. या वाक्याचे तीन भाग करायचे आहे. जसे की १. एक मछली, २. पानी में गई, ३. छपाक. खेळ खेळताना ग्रुपमधील प्रत्येकाने हे तीन वाक्य म्हणायची आहे त्यानंतर हे तीन वाक्य संपले की लगेच समोरच्याने दो मछली पानी में गई छपाक १. एक मछली, २. पानी में गई, ३. छपाक. हे वाक्य दोनदा म्हणायचे आहे. अशीच संख्या वाढवायची. जी व्यक्ती हे म्हणताना गडबड करेन ती खेळामधून आउट होईल. जर तुम्हाला हा खेळ नीट समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ बघा.

हेही वाचा : धक्कादायक! प्रवाशांनी चक्क रेल्वेच्या शौचालयात उभं राहून केला प्रवास, रेल्वेतील भयंकर गर्दीचा VIDEO होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

maan_na.maanandrals2193 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला तरुण मुले हा खेळताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते एक मछली… पानी मे गई.. छपाक हे वाक्य चौथ्या फेरीपर्यंत नीट म्हणतात पण पाचव्या फेरीमध्ये ग्रुपमधील एक जण चूक करतो आणि तो आउट होतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हा खेळ नेमका कसा खेळायचा, याचा अंदाज येईल.

मीम्स व्हायरल

अनेक युजर्सना हा खेळ आवडला आहे. सोशल मीडियावर लोकं या खेळाचे व्हिडीओ बनवताना दिसत आहे पण त्याचबरोबर याचे काही मजेशीर मीम्स सुद्धा व्हायरल होत आहे. काही मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हे मीम्स चांगलेच चर्चेत आहे.