Nikocado Avocado Weight Loss Video : जगात असे अनेक लोक आहेत की, ज्यांचे वजन सरासरीपेक्षा जास्त आहे. वाढत्या वजनामुळे अशा लोकांना नेहमीच टोमणे ऐकावे लागतात; पण काही लोक असे आहेत की, जे आपल्या लठ्ठपणाचा फायदा घेत प्रसिद्ध होतात. अशाच प्रकारे फूड व्लॉगर यूट्यूबर निकोलस पेरी त्याच्या लठ्ठपणा आणि भरपूर खाण्याच्या आवडीने खूप प्रसिद्ध झाला, रोज फास्ट फूडचे वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करीत तो यूट्यूब स्टार बनला. पण, याच यूट्यूबरने यूट्यूबवर गेली दोन वर्षे लोकांना मूर्ख बनवीत स्वत:चे तब्बल ११४ किलो वजन घटवले आहे. त्याने हे नेमके कसे काय शक्य केले हे तुम्ही एकदा वाचाच…

पेरीने केला आयुष्यातील सर्वात मोठा सोशल मीडिया एक्स्पेरिमेंट

अमेरिकेतील प्रसिद्ध फूड व्लॉगर निकोलस पेरीला यूट्यूबर म्हणून ओळखले जाते. त्याने नुकताच एक नवा व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यात त्याने दोन वर्षांत स्वत:चे ११४ किलोपेक्षा जास्त वजन कमी केल्याचा खुलासा केला आहे. त्याच्या या खुलाशाने आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण- पेरी हा रोज फूडचे अनेक व्हिडीओ पोस्ट करीत होता. त्यामुळे अनाचक त्याने हे कसे काय शक्य केले, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. त्याने वजन घटवल्यानंतरचा व्हिडीओ पोस्ट करीत आतापर्यंतचा हा माझा सर्वांत मोठा सोशल मीडिया एक्स्पेरिमेंट होता, असे म्हटले आहे.

indian railway viral video man breaks train window
“आता कुठेयत रेल्वे पोलीस अन् टीटी?” व्यक्तीने बांबूने भराभर तोडल्या ट्रेनच्या काचा अन्…; Video पाहून संतापले युजर्स
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
mumbai metro viral video
मुंबई मेट्रोत प्रवाशांची खचाखच गर्दी, तरीही सीट रिकाम्याच; नेमकं घडलं तरी काय? Video पाहून बसेल धक्का
iphone 16 online delivery in 10 minutes by blinkit ceo shared post
फक्त एक क्लिक आणि १० मिनिटांच्या आत iPhone 16 तुमचा, Blinkitने अवघ्या काही वेळातच केला ३०० ऑर्डर्सचा टप्पा पार
Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel got upset when Nikki and Abhijeet were announced as the popular couple
Video: ‘बिग बॉस’ची ‘ती’ घोषणा ऐकताच अरबाज पटेलचा पडला चेहरा, नेमकं काय घडलं?
lizard viral video in marathi
किचनमधील तुमची ‘ही’ एक चूक अन्नाचे बनवू शकते विष; गृहिणींनो हा धक्कादायक Viral Video एकदा पाहाच
Kidnapping Case Fact Check Video in marathi
लिफ्टमध्ये शिरले मुलींच्या तोंडावर रुमाल दाबला अन् केले अपहरण; Video खरा; पण नेमका कुठला? जाणून घ्या सत्य
bike theft video viral
खतरनाक धुलाई! बंदुकीचा धाक दाखवून करू लागले बाईक चोरी, पण काही मिनिटांत उलटलं चित्र; पाहा थरारक घटनेचा VIDEO

लोकांना कसे बनवले मुर्ख?

पण, तो गेली दोन वर्षे सतत खाण्याचे व्हिडीओ पोस्ट करीत होता; ज्यात तो पूर्वीसारखाच लठ्ठ दिसत होता. मग पेरीने हे कसे शक्य केले आणि लोकांना कसे मूर्ख बनवले हे त्याने पुढे सांगितले आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध यूट्यूबर निकोलस पेरीला चाहते निकोकाडो अॅव्होकॅडो या नावाने ओळखतात. निकोलसचे यूट्यूबवर ४.१९ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने एक दिवसापूर्वी वजन घटवल्यानंतरचा एक व्हिडीओ पोस्ट केला, जो आतापर्यंत २९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओतील त्याचा खुलासा ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पेरीने उघड केले की, मागील दोन वर्षांत त्याने गुपितपणे २५० पौंड म्हणजे ११४ किलो वजन कमी केले आहे. गुपित यासाठी म्हटले की, कारण गेली दोन वर्षे तो सोशल मीडियावर नियमितपणे पोस्ट करीत होता आणि प्रेक्षकांना त्याचे वजन कमी झाल्याचेही लक्षात आले नाही. यामागचे कारण म्हणजे त्याने दोन वर्षांपासून कोणताही नवीन व्हिडीओ बनवलेला नाही. या काळात फक्त त्याने त्याच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित केले होते; पण या काळात तो चॅनेल सुरू ठेवण्यासाठी जुन्या कन्टेंटचे पोस्ट करीत राहिला.

हेही वाचा –

पेरीने त्याच्या टू स्टेप्स अहेड या व्हिडीओमध्ये वजन कमी करण्यापर्यंतच्या प्रवासात प्री-रेकॉर्ड व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना कसे मूर्ख बनवले हे मान्य केले. या व्हिडीओच्या सुरुवातीला पेरीने संपूर्ण चेहरा झाकण्यासाठी पांडाचा डोके असलेला एक टेडी घातला आहे. यावेळी तो म्हणतोय की, मी नेहमी दोन पावले पुढे असतो.

यात तो पुढे असही म्हणतोय की, हे बॉडी ट्रान्स्मेशन त्याच्यासाठी अत्यंत वैयक्तिक आणि खासगी बाब होती; ज्याला त्याने आता आयुष्यातील सर्वांत मोठा सोशल मीडिया एक्स्पेरिमेंट, असे म्हटले आहे.