पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकन दौऱ्याअंतर्गत ह्य़ुस्टन येथे आयोजित केलेल्या ‘हाउडी मोदी’ मेळाव्याला अनिवासी भारतीयांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. एनआरजी स्टेडिअमवर पार पडलेल्या मोदींच्या या मेळाव्याला तुफान प्रतिसाद मिळाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही या मेळाव्याला उपस्थित होते. मोदी आणि ट्रम्प यांनी परस्परस्तुती करून आणि भारत-अमेरिका मैत्रीचा विविधांगी आढावा घेतानाच, इस्लामी दहशतवादाविरोधात लढा तीव्र करण्याचे आश्वासनही स्वतंत्र भाषणांमध्ये दिले.

मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ट्रम्प यांचा उल्लेख त्यांनी भारतमित्र असा केला. तर ट्रम्प यांनी मोदी यांचा उल्लेख महान नेते असा केला. ही सभा अनेक अर्थानी ऐतिहासिक ठरली. या मेळाव्याच्या निमित्ताने अमेरिकी अध्यक्ष आणि भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेमध्ये एखाद्या सभेला पहिल्यांदाच एकाच मंचावरुन संबोधित केले. मोदी आणि ट्रम्प यांनी एकमेकांबद्दल दाखवलेले प्रेम आणि आदार, मोदींनी पाकिस्तानवर नाव न घेता साधलेला निशाणा आणि मोदींच्या मेळाव्याला मिळालेला तुफान प्रतिसाद याच मुद्द्यांवरुन इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु होती. #HowdyModi हा हॅशटॅग ट्वटिवर टॉप ट्रेण्डींग होता. त्याचबरोबर #ModiInUSA, #DonaldTrump हे हॅशटॅगही ट्रेण्ड होताना दिसले. असं असतानाच अनेकांनी या मेळाव्यासंदर्भात अनेक मिम्स ट्विटरवर शेअर केला. यामध्ये अगदी या सभेचा प्रतिसाद पाहून रक्तदाब तपासणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्यापासून ते ट्रम्प केवळ गरबा खेळणं बाकी होतं अशा भन्नाट टिप्पणी नेटकऱ्यांनी केल्या. इतकच नाही तर ट्रम्प यांचे भाजपा सदस्यत्वाचे ओळखपत्र असो किंवा व्हाइट हाऊसवर फडलेला भगवा असो अनेक भन्नाट फोटोशॉप केलेले मिम्सही व्हायरल झालेले पहायला मिळाले. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले मिम्स…

यांचा रक्तदाब वाढला

बोलू द्या

व्हाइट हाऊसवर भगवा

असं ट्रोल कोणीच करु शकत नाही

भाजपाचे सदस्य झाले

जागावाटप

बास आता रडवशील

काँग्रेसपेक्षा मोदींना जास्त समर्थक अमेरिकेत

इम्रान खान

गरबा

ऐकायची सवय ठेवा

चीनमध्ये निवडणुका कधी आहेत?

दरम्यान, ह्य़ुस्टनचे महापौर सिल्वेस्टर टर्नर यांनी ह्य़ुस्टन-भारत प्रेमाचे प्रतीक म्हणून शहराची प्रतीकात्मक चावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त केली. प्रतिनिधिगृहातील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते स्टेनी होयर यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील समान मूल्यांचा आणि भारतीय-अमेरिकी नागरिकांच्या कर्तृत्वाचा, योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. या कार्यक्रमाला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट अशा दोन्ही पक्षांचे सिनेटर, प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाच्या आधी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मॅडिसन स्क्वेअर किंवा सान होजेपेक्षाही ह्य़ुस्टनमधील कार्यक्रम अधिक भव्य आणि परिणामकारक झाला.