तुम्ही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट नक्कीच पाहिला असेल. त्यामध्ये नंदिनी (ऐश्वर्या राय) आणि समीर (सलमान खान) प्रेमी जोडपे दाखवले आहे पण नंदिनीचे लग्न वनराजबरोबर (अजय देवगन) लावले जाते. पण जेव्हा नंदिनी समीरवर प्रेम करते हे वनराजला समजते तेव्हा तो तिला तिच्या प्रेमीकडे परत नेण्याचे वचन देतो. तुम्ही म्हणाल ही तर फिल्मी कथा आहे खऱ्या आयुष्यात असे कधीही होत नाही. तुम्हीही असा विचार करत असाल तर तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की आता खऱ्या आयुष्यातही असे घडले आहे. हम दिल दे चुके सनम’ची कथा आता खऱ्या आयुष्यात घडली आहे.
खऱ्या आयुष्यात घडली फिल्मी कथा
उत्तर प्रदेशच्या देवरिया येथील बरियापूरमधील एक व्यक्ती विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी पोहचला होता. ज्याक्षणी ही गोष्ट लोकांना समजली तेव्हा लोकांनी प्रेमीला खूप चोप दिला. पण प्रेमिकेच्या पतीला हे सर्व पाहावले नाही. त्याने मंदिरमध्ये आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रेमीसह लावून दिले आणि आनंदाने त्यांची निरोप ही दिला. या आगळ्या- वेगळ्या लग्नाची चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा – ॲपल वॉचच्या नादात शौचालयात अडकली महिला! नंतर करू लागली आरडा-ओरडा; संपूर्ण प्रकरण वाचून तुम्हीही डोकं धराल
तरुणाने पत्नीचे लावून दिले प्रेमीशी लग्न
हे सर्व प्रकरण देवरिया जिल्ह्यातील बरियापूर नगरपंचायतीमधील प्रकरण आहे. येथे राहणाऱ्या तरुणाचे लग्न एका वर्षापूर्वी बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यातील भोरे परिसरातील एका गावामधील तरुणीसह झाले होते. सर्व काही सुरळीत सुरु होते पण शुक्रवारी रात्री त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी तिचा प्रेमी अचानक आला. बिहारमध्ये राहणारा हा व्यक्ती प्रेमिकेच्या सासरी पोहचला. घरामध्ये त्याला रंगे हात पकडल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले आणि त्याला चोप दिला.
प्रेमीला असे मार खाताना पाहून प्रेमिका तिच्या पतीला मदत मागू लागली तिच्या प्रेमीला सोडून द्या अशी विनंती करू लागली. हे सर्व तिच्या नवऱ्याला पहावले नाही आणि त्याने ठरवले की तो आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रेमीसह करून देणार. पतीने आपल्या घराच्या आणि त्याच्या सासरच्या लोकांना आधी यासाठी तयार केलं. जेव्हा ते या लग्नाला तयार झाले तेव्हा मंदिरामध्ये आपल्या पत्नीचे तिच्या प्रेमीसह लग्न लावून दिले आणि आंनदाने तिची पाठवणी केली.
दोन वर्षांपासून होतो पत्नी आणि प्रेमीचं नातं
बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यात भोरे येथेीले रेडवरिया गावात राहणाऱ्या आकाश शाहने दिलेल्या माहितीनुसाप, त्याचे शेजारच्या गावात राहणाऱ्या तरुणीसह दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. तो वेल्डिंगचे छोटे-मोठे काम करतो. दरम्यान एकवर्षापूर्वी त्याच्या प्रेमिकेचे लग्न देवरिया येथील बरियापूरमधील एका व्यक्तीसह झाले पण तो आपल्या प्रेमिकेला विसरू शकला नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री तो तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला. सुरुवातीला त्याला गावकऱ्यांनी खूप चोप दिला पण नंतर त्याचे लग्न त्याच्या प्रेमिकेसह लावून दिले.
पोलीस स्टेशन प्रभारी दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, त्यांनाही या प्रकरणाची माहिती मिळाली होती. मात्र गावकऱ्यांनी गावपातळीवर हे प्रकरण मिटवले.