Premium

कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी तयार केली मानवी साखळी; Viral Video पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक

अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. कमेंट सेक्शनमध्ये कुत्र्याला वाचवणाऱ्या व्यक्तींचे कौतुक झाले आहे.

Human chain created to save dog life
व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एक कुत्रा अतिशय वेगाने वाहणाऱ्या कालव्यात अडकल्याचे दिसत आहे. (Photo : Twitter/@TansuYegen)

सोशल मीडियावर लोकांच्या शौर्याशी संबंधित अनेक व्हिडीओ आहेत. काही व्हिडीओ तर लाखो वेळा पाहिले गेले आहेत. स्वतःच्या जीवावर खेळून इतरांचा जीव वाचवणाऱ्या अशा धाडसी लोकांचे कौतुक करताना इंटरनेट वापरकर्ते कधीही थकत नाहीत. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ कझाकिस्तानमधील अल्माटी शहरातील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा माणूस जीवाची पर्वा न करता कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी एका कालव्यात उतरतो. त्याचवेळी आजूबाजूचे लोक त्याचे शौर्य पाहून त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि त्याला मदत करण्यासाठी मानवी साखळी तयार करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एक कुत्रा कालव्यात अडकल्याचे दिसत आहे. कालवा अतिशय वेगाने वाहत आहे. कालव्याच्या मधोमध कुत्रा कुठून अडकला हे कळत नाही. कालव्यात कुत्रा अडकलेला पाहून कसलाही विचार न करता एक व्यक्ती आपला जीव पणाला लावून कुत्र्यासाठी पाण्यात उतरतो. कालव्याच्या मोठ्या भिंतीवरून घसरून तो पाण्यात येतो. ती व्यक्ती पाण्यात सावधपणे पुढे जाते आणि कुत्र्याजवळ पोहोचते. कसा तरी तो कुत्र्याला कालव्यातून बाजूला घेऊन येतो. परंतु, आता तिरक्या उंच भिंतीवरून कुत्र्याला कसे न्यायचे? हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहतो.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

व्हायरल व्हिडीओमध्ये पुढे बघायला मिळतं की, ती व्यक्ती किनाऱ्यावर उभी आहे, हे पाहून कालव्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्यासाठी मानवी साखळी बनवू लागतात. एकापाठोपाठ एक अनेक जण मानवी साखळीत सामील होऊन कुत्र्याला व त्या व्यक्तीला कालव्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागतात. पण तरीही त्यांची साखळी पूर्ण होत नाही. यावेळी त्यांना आणखी एका व्यक्तीची गरज भासते. तेव्हा दूर उभी असलेली व्यक्ती धावत येऊन साखळी पूर्ण करते आणि सर्व लोक मिळून त्या माणसाला आणि कुत्र्याला कालव्यातून सुखरूप बाहेर काढतात.

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

हा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. ट्विटरवरच हा व्हिडीओ जवळपास २ कोटीवेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर ३४ हजार लोकांनी या व्हिडीओला लाइक देखील केले आहे. हा व्हिडीओ वेगाने रिट्विटही होत आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी रिट्विट केला आहे. असे शौर्य दाखवून त्या व्यक्तीने लोकांची मने जिंकली आहेत. कमेंट सेक्शनमध्ये कुत्र्याला वाचवणाऱ्या त्या व्यक्तीचे कौतुक झाले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Human chain created to save dog life you too will appreciate the efforts after watching this viral video pvp

First published on: 17-05-2022 at 11:07 IST
Next Story
या पठ्ठ्याने रेल्वे रुळावर चालवला ट्रॅक्टर; विश्वास बसत नसेल तर पाहा हा Viral Video