Humpback Whale Viral Video: समुद्रातील जैवविविता आपल्या सगळ्यांनाच थक्क करणारी आहे. विशाल समुद्रात मुंगीच्या आकाराएवढे जीव, तसेच थेट ५० टनांपर्यंतचे देवमासेसुद्धा असतात हे आपल्याला माहीत आहे. देवमासा हा समुद्रातील सर्वांत मोठा मासा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याला पाहण्याची अनेकांना उत्सुकता असते. मात्र, विचार करा हा मासा तुमच्या बोटीला धडकला तर? ऐकूनच भीती वाटली ना… मात्र असा प्रकार प्रत्यक्षात काही लोकांसोबत घडलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साहजिकपणे हा व्हिडीओ पाहून लोक चकित झाले आहेत. बोटीवर देवमाशाचा हल्ला व्हेल आणि शार्कसारखे अनेक महाकाय प्राणी समुद्रात आढळतात, त्यापैकी हंपबॅक व्हेल हा शांत प्राणी मानला जातो. अशा परिस्थितीत महाकाय व्हेलमुळे समुद्रात प्रवास करणाऱ्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते, अशा घटना क्वचितच ऐकायला मिळतात. जर कोणी समुद्रात लहान बोटीने प्रवास करत असेल तर त्याला विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येतो, कारण हंपबॅक व्हेलच्या एका उडीमुळे छोटी बोट पलटी होण्याचा धोका असतो. एका क्षणात बोट उलटवली दरम्यान, सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महाकाय हंपबॅक व्हेल संपूर्ण बोट उलटून टाकते. यावेळी जवळच्या लहान बोटींमध्ये बसलेल्या लोकांची अवस्था पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, देव माशानं या बोटीवर कसा हल्ला करत एका क्षणात बोट उलटवली. शेवटी बोटीतले लोकंही खाली पाण्यात पडताना दिसत आहे. मात्र सुदैवाने, बोटीवरील सर्व लोक सुरक्षित आहेत, परंतु या दुर्घटनेतून सावरण्यात यश आलेले नाही. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये ही भयावह घटना घडली आहे. कॅमेऱ्यात कैद झालेले हे विदारक दृश्य सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> VIDEO: दिल्लीत भरदिवसा भाजी विक्रेत्याबरोबर भयंकर घडलं; दोन तरुणांची लुटमारीची नवीन आयडीया पाहून व्हाल अवाक् हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचा थरकाप उडालाय. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून, त्या लोकांवरही टीका करीत आहेत. हा व्हिडिओ @cornelldolanpc नावाच्या एक्स खात्यावर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे - बोटीवर असलेली व्यक्ती ठीक आहे की नाही? दुसऱ्या युजरने लिहिले आहे – म्हणूनच लाइफ जॅकेट घालणे खूप महत्वाचे आहे.