Cute Heart-Touching Video : लहान मुलं फार निरागस असतात, त्यांना जगाशी काही घेणं-देणं नसतं, मस्त मज्जा- मस्ती करत राहायचं हेच त्यांच्या आवडीचे काम असते. त्यामुळे ती नेहमीच सर्वांना आवडतात. त्यांचे ते खट्याळ नटखट वागणं पाहून अनेकदा आपल्याला हसू आवरणं अवघड होतं. सध्या अशाच एका निरागस चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात तो शाळेत चालत जात असतो. पण भूक लागल्याने तो अचानक रस्त्याच्या मधेच थांबतो आणि डब्बा काढून खाऊ लागतो. त्याला आजू-बाजूने जाणारे लोक काय म्हणतील कशाची काही पडलेली नाही, तो आपल्याच जगात वावरतोय, या व्हिडीओतून लहान मुलं किती निष्पाप, निरागस असतात हे दिसते.

व्हिडीओ पाहू शकता की, एक लहान मुलगा शाळेत चालत जातोय, पण रस्त्यात चालता चालता त्याला अचानक भूक लागते. म्हणून त्याने आईने मधल्या सुट्टीत खाण्यासाठी दिलेला डब्बा चक्क रस्त्यात उघडला. पाठीवरची बॅग तशीच रस्त्यात ठेवून तो आधी डब्बा खाऊ लागला. नंतर रस्त्यातच पायांवर बसून त्याने डब्बा खाण्यास सुरुवात केली. यावेळी डब्ब्यात असलेले नूडल्स तो अगदी मन लावून खाऊ लागला. यावेळी रस्त्याने जाणारे लोकं काय म्हणतील याची पर्वा न करता तो नूडल्स खाण्याचा आनंद घेत होता.

चिमुकला रस्त्यात बसून डब्बा खातोय हे पाहून अनेकजण त्याच्या जवळ गेले आणि हसू लागले. यावेळी एकाने चिमुकल्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.असं रस्त्यात बसून खाणं चुकीचं दिसतं किंवा काय कसाच विचार त्याने यावेळी केला नाही, कारण त्याला भूकचं इतकी लागली होती.

चिमुकल्याचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतोय. ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेकांनी हा लहानगा नूडल्स खाताना किती निरागस, गोंडस दिसतोय असे म्हटले. तर काहींना त्याची ही डब्बा खाण्याची पद्धत पाहून हसू आले.