सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये माकडांचेही अनेक मजेशीर व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. फळे किंवा खाद्यपदार्थ घेऊन पळून जाताना किंवा लोकांच्या हातातून हिसकावून घेताना नेहमी पाहिले असेल. सध्या असाच काही भुकेल्या माकडांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला भुकेल्या माकडांची दया येईलच पण त्याची चेहऱ्यावर हसू देखील येईल.

हा व्हायरल व्हिडीओ एका मंदिरातील आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका तरुणीच्या हातामध्ये एका पॅकटेमध्ये भात आहे. एक माकड तिच्याजवळ येते आणि हिसकावून घेते. माकड ते पॅकेटमधील भात जमिनीवर पसरवते आणि खाऊ लागते. हे पाहून तरुणीला हसू येते. तिथे माकडासह एक मादी माकड आणि तिचं पिल्लू देखील आहे जे तिथे सांडलेला भात खात आहे. तरुणी त्या माकडांना हाताने भात भरवू पाहते तेव्हा ते तिच्याकडे दुर्लक्ष करतात. नंतर तरुणी तिच्या ड्रेसवर सांडलेला भात खाताना दिसत आहे तेवढ्यात ते माकड पुन्हा तिच्याकडे येते आणि तो भातही खाऊ लागते. तरुणीला माकडाची दया येते. माकडाला घास उचला येत नाही हे पाहून ती भाताचा घास घेऊन माकडासमोर धरते. माकड तिच्या हातातील भात घेऊन पटापट खाते.

हेही वाचा – हॉस्टेलमध्ये तरुणींनी केला जबरदस्त डान्स; व्हायरल व्हिडीओ पाहताच नेटकरीही झाले फॅन, म्हणाले, ‘रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा …’

हेही वाचा – जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी दिल्लीमध्ये ‘आलू टिक्की’चा घेतला आस्वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल

तरुणीची प्राणीदया पाहून सर्वांनाच तिचे कौतूक वाटत आहे. हा व्हिडीओ अतिशय सुंदर आहे, जिथे प्राणीदया आणि माणुसकीचे उत्तम दर्शन घडते आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. काही लोक वारंवार हा व्हिडीओ पाहत असल्याचे सांगत आहे.

Story img Loader