Viral Video : सोशल मीडियावर नवरा-बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे पण या व्हिडीओमध्ये नवरा त्याच्या दोन बायकांमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या या हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दुसऱ्या बायकोसोबत नवऱ्याला पाहून त्याच्या पहिल्या बायकोचा पारा चढतो आणि ती नवऱ्याला तिथेच मारायला सुरुवात करते. हे पाहताच दुसरी बायको त्याच्या पहिल्या बायकोच्या अंगावर धावून येते. त्या एकमेकींचे केस ओढतात. हा सर्व प्रकार पाहून नवरा जेव्हा दोघींमधील भांडण सोडविण्याचा खूप प्रयत्न करायला लागतो तेव्हा पहिली पत्नी त्याला चपलाने मारायला सुरुवात करते. फुल ड्रामा असलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ नालंदा येथील एका हॉस्पिटल परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : सासू-जावयाचा भन्नाट डान्स! बायको पाहतच राहिली, सोशल मीडियावर Video व्हायरल

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला दोन बायका आहेत. पहिल्या बायकोचा आरोप आहे की नवऱ्याने तिला धोका देऊन दुसरी बायको केली. पतीचे नाव प्रेमजीत आहे. प्रेमजीतने दहा वर्षांपूर्वी जुली कुमारीसोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत. त्यानंतर मागच्या वर्षी प्रेमजीतने अनिशा कुमारीसोबत दुसरे लग्न केले. सध्या अनिशा प्रेग्नेंट आहे. प्रेमजीतची आई मात्र त्याच्या पहिल्या पत्नीला सून मानते.

हेही वाचा : “तुझी आई, दीदी..” लग्नासाठी ‘ती’च्या विचित्र मागण्या; तरुणाच्या ‘या’ प्रश्नावर करू लागली शिवीगाळ; Whatsapp Chats व्हायरल

या प्रकरणी व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे, “अब्दुल तो यूंही बदनाम है, असल मज़े तो घनश्याम ले रहा है|”

Story img Loader