Video Viral : सोशल मीडियावर अनेक पती पत्नीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी पती पत्नीच्या नात्यातील गोडवा दिसून येतो तर कधी त्यांच्या नात्यातील प्रेम दिसून येते. अनेकदा पती पत्नीचे भांडतानाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पती पत्नी भांडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही तर काही लोक अवाक् होतील. पत्नी नवऱ्याला मारताना दिसत आहे तर पती मात्र पत्नीपासून वाचण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

नवरा बायकोच्या भांडणाचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल. 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरात एक नवरा भांडी घासत आहे. त्याच वेळी त्याची पत्नी संतापलेली आहे आणि ती तो काय करत आहे ते पाहत त्याच्या जवळ येते. संतापलेल्या महिलेचा अचानक संयम सुटतो आणि ती नवऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात करते. घरातच जोरदार आरडाओरड होते आणि हळूहळू वातावरण तापत जाते. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आजकाल कुठे ना कुठे गंभीर प्रकरण होतं असतात आणि ती कानावर पडत असतात. कोणाची हत्या तर कोणाची आत्महत्या तर ठरवून केलेला निर्घुण खून अशा सगळ्या घटना सध्या सगळीकडेच घडत आहेत. असे निर्दयी लोक दुसऱ्यांना त्रास देण्याआधी कसलाच विचार करत नाहीत.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप कठीण आयुष्य आहे” तर एका युजरने लिहिलेय, “भावा मी लग्न करणार नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “वैवाहिक आयुष्याचा आनंद घ्या” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. का युजरने म्हटेल आहे की, बाई काय खात असेल, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ चांगलाच आदळला. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बिचार. काय चाललंय काय कोणी कुठेही भांडत असते असेही एकाने म्हटले आहे. तर चौथ्या एकाने नवऱ्याचीच चूक असेल असे म्हटले आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती नाही.