Viral video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेली घटना पाहून प्रत्येकजणांचा संताप होत आहे. एका नवऱ्यानं आपल्या बायकोला
उंच इमारतीच्या रेलिंगवरून लटकवले आहे. प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं.
जोडप्यामधील एकाने दुसऱ्यासोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याच्या किंवा हत्या केल्याच्याही घटना समोर येत असतात.आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकजणांनी त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका इमारतीमधून लोकांचा किंचाळण्याचा आवाज सुरुवातीस ऐकू येतो मात्र व्हिडिओच्या पुढे दिसते की, एक महिला उंच इमारतीच्या रेलिंगला लटकली आहे. पण ती लटकलेली नसून तिला तिच्या पतीने रागाच्या भरात लटकवलं आहे. सर्व प्रकार पाहून इमारतीचे लोक बाहेर आले. मात्र कोणीही त्या वेळी तिथे तिच्या मदतीसाठी पोहचलेला दिसून येत नाही. थोडा जरी हात सुटला तरी यावेळी ही महिला खाली पडू शकते अशी परिस्थिती आहे.यावेळी कुणीतरी लपून या घटनेचा व्हिडीओ काढला असून आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम @gharkekalesh वरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “हे कसलं प्रेम? या अशा लोकांमुळेच चांगल्या मुलांचे नाव खराब होते. अनेकांनी त्या व्यक्तीवर काय कारवाई झाली की नाही असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने म्हटले आहे की, ” नवरा की हैवान?इतक्या टोकाला हे कसे काय जाऊ शकतात” तर आणखी एकानं, “एवढी क्रूरता येतेच कुठून” अशी प्रतिक्रिया दिली आहे.