काही दिवसांपूर्वी भिवंडीतील एका लग्नातील व्हिडिओ व्हायरला झाला होता. भिवंडीमधील अलाईड पेट्रोल पंपजवळ खंडू पाडा येथील अन्सारी मेरेज ओपन हॉलला रविवारी म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली होती. मात्र एक व्यक्ती मटणाचा आस्वाद घेत होती. आगीच्या ज्वाला अगदी उंच उच जात असताना ही व्यक्ती मात्र निवांत बसून मटणावर ताव मारत होता. दुसरीकडे, मटणावरून पती आणि पत्नी यांच्यात वाद झाला आहे. शाकाहारी पती आणि मांसाहारी पत्नीचा वाद थेट सोशल मीडियावर पोहोचला आहे. पत्नीनं मटण सोडण्यास नकार दिल्याने पतीची कोंडी झाली आहे. हा वाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. एका व्हायरल ट्वीटमध्ये पतीने कॉलमिस्टकडे आपल्या पत्नीबाबत सल्ला मागितला आहे.

कॉलममध्ये शाकाहारी माणसाने लग्न कसे झाले याबाबत लिहीलं आहे. “मी पत्नीशी लग्न केलं तेव्हा ती शाकाहारी असल्याचं वाटलं होतं. तिचं कुटुंब शाकाहारी आहे. मात्र तिला मटण खायला आवडतं. मात्र लग्नानतर मटण खाणं सोडून देईल असं वचन पत्नीने दिलं होतं. ती सुंदर असल्याने या अटीवर मी तिच्याशी लग्न करण्यास तयार झालो. मात्र अजूनही ती लपूनछपून मटण खाते. तिने वचन पूर्ण केलं नसून मटण खाण्याची सवय कायम ठेवली आहे. आता ती सांगते की, मटण खायला आवडतं आणि त्याशिवाय राहू शकत नाही. मी तिला पुन्हा एकदा माफ करण्यास तयार आहे. तिला अल्टिमेटम दिला आहे नवरा की मटण? यापैकी एक निवड. मला भिती आहे की, ती मटण निवडेल की काय?. तुम्हाला काय वाटतं ती काय निवडेल?”, असं लिहीलं आहे.

‘गोपी बहू’सारखं वागणं पडलं महागात; बंगळुरूत लॅपटॉप धुणाऱ्या पत्नीला पतीकडून…

पतीच्या तक्रारीनंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तर मटणाशिवाय राहणं अशक्य असल्याचं लिहीलं आहे.

आता पती आणि पत्नीमधील मटणाचा वाद कसा सुटेल? याबाबत माहिती नाही. हा प्रश्न एकमेकांसोबत बोलून सोडवण्याशिवाय गत्यंतर नाही. जर तुम्ही पत्नीच्या जागी असता तर तुम्ही काय निवडाल? तुमच्या जोडीदारासाठी मटण खाणे बंद कराल का? किंवा तुम्ही तुमच्या शाकाहारी जोडीदाराशी लग्न करण्यापेक्षा मटण निवडाल? आता हा प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारा.